
Jalgaon News : जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवार (ता. १२)चे तापमान ४३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. दरम्यान, सकाळी जोरदार वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीअंशी कमी होण्यास मदत झाली. असे असले तरी तापमान यंदा ४७ अंश गाठेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे उन्हाच्या तीव्रतेने भूजल पातळी कमी होत आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत सरासरी ४३.७७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
अजून अडीच महिने पावसाळ्यासाठी वाट पाहावी लागेल. आगामी मे आणि जूनमध्ये पाणीटंचाई जाणवणाऱ्या ५६५ गावांसाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर असे तीन मोठे, मध्यम व लघु असे ९६ प्रकल्प आहेत. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
जळगावात टंचाई नाही
जळगाव शहरासह ग्रामीण परिसराला वाघूर प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. वाघूर प्रकल्पात आज ७९ टक्के जलसाठा असल्याने जळगाव शहरवासियांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जाण्याची शक्यता नाही.
७७.२० कोटींचा आराखडा
गतवर्षी मॉन्सून कमी झाल्याने १०८ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. यात टंचाई निवारणासाठी प्रशासनाने १३८ टँकरसह १६६ गावांसाठी १९१ विहिरींचे अधिग्रहण केले होते. तर या वर्षी पाणीटंचाई निवारणासाठी सुमारे ७७.२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
‘गिरणा’त झपाट्याने घट
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्पावर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगावसह अन्य दहा पालिका, मालेगाव महापालिका तसेच १७४ गावे आणि १३० पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत देण्यात आलेल्या आवर्तनामुळे आणि दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पात आजमितीस केवळ ३१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
टँकरचे प्रस्ताव स्थानिक स्तरावर पाणीटंचाई
निवारणासाठी टँकर प्रस्ताव मंजुरी स्थानिक उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहेत. संभाव्य पाणीटंचाई आराखडा ऑक्टोबरअखेर तयार करण्यात येतो. त्यानुसार प्रत्यक्ष खर्च झाल्यानुसार तेवढ्याच रकमेचे अनुदान मागणीचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला जात असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.