Soybean Trading : सांगलीत विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

Soybean Rate : सोयाबीन या शेतमालाचा काढणी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून बाजार समितीच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
Soybean Trading
Soybean Tradingagrowon
Published on
Updated on

Sangli Soybean Rate : सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तयार केलेल्या भरारी पथकाने विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बुधवारी (ता.०३) कारवाई करून दंड वसूल केला.

सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून बाजार समितीच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने बुधवारी चिकुर्डे परिसरात भेट देऊन पाहणी केली. सावर्डे (ता. मिरज) येथील सोयाबीन खरेदीदार व्यापारी ओंकार पाटील विनापरवाना सोयाबीन खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले.

संबंधित व्यापाऱ्यावर बाजार समिती कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर पथकाने या भागातील अन्य सोयाबीन व्यापाऱ्यांचे वजन काटे तपासले. पथकात माणिक देसावळे, संपत पाटील, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील यांचा समावेश आहे.

Soybean Trading
NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय जाधव म्हणाले की, इस्लामपूर बाजार समितीमार्फत सोयाबीन शेतमाल तारण योजना सुरू होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन शेतमाल तारण ठेवून वार्षिक ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इस्लामपुरातील बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

सद्यःस्थितीत बाजार समितीने ‘नाफेड’कडे सोयाबीन खरेदी केंद्राची मागणी केली असल्याची माहिती सभापती संदीप पाटील यांनी दिली. लवकरच समितीतर्फे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होईल. शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमालाची विक्री करण्यास घाई करू नये, असे आवाहन ही पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com