PDKV Shiwarferi : ‘पंदेकृवि’त शुक्रवारपासून शिवारफेरी

PDKV Foundation Day : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २० ते २२ सप्टेंबर या काळात तीनदिवसीय शिवारफेरी व थेट पीक प्रात्यक्षिक तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
PDKV Shiwarferi
PDKV ShiwarferiAgrowon
Published on
Updated on

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २० ते २२ सप्टेंबर या काळात तीनदिवसीय शिवारफेरी व थेट पीक प्रात्यक्षिक तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत या शिवारफेरीचे उद्‌घाटन होणार आहे.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्षस्थानी राहतील. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, खासदार अनुप धोत्रे, डॉ. हिमांशू भोज, कृषी सचिव जयश्री भोज, कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. प्रशांतकुमार पाटील (राहुरी), डॉ. इंद्र मणी (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

PDKV Shiwarferi
PDKV : ‘पंदेकृवि’च्या बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयात पदनिर्मितीस मान्यता

शनिवारी येणार आमिर खान

शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. २२) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.

PDKV Shiwarferi
PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

शिवारफेरीची तयारी जोरात

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी या विद्यापीठाची सूत्रे हातात घेतल्यानंतर गेल्या वर्षी शिवारफेरीचे स्वरूप बदलले. ऑक्टोबरमध्ये दरवर्षी घेतली जाणारी शिवारफेरी खरीप पिकांच्या स्थितीचा विचार करताना सप्टेंबरमध्ये सुरू केली.

सोबतच प्रत्येक पीक वाणांचे थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने नियोजन सुरू झाले. पहिल्याच वर्षात शेतकऱ्यांनी या शिवारफेरीचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदा हे थेट प्रात्यक्षिकाचे दुसरे वर्ष आहे. यासाठी प्लॉट तयार करण्यात आले आहेत. याची प्रत्येक विभागाला जबाबदारी देण्यात आली होती. विद्यापीठासह कंपन्याचेही डेमो प्लॉट लावण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com