Arrears of Workers : आधी थकित देणी द्या, मग कारखान्याचे हस्तांतर करा

Vasantdada Sugar Factory : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यापूर्वी वा कुणाला देण्याआधी या कारखान्यातील कामगारांची थकित देणी दिली जावी, अन्यथा अशा घडामोडी होण्याच्या दरम्यान आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल.
Vasantdada Sahakari Sugar Factory
Vasantdada Sahakari Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nashik News : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यापूर्वी वा कुणाला देण्याआधी या कारखान्यातील कामगारांची थकित देणी दिली जावी, अन्यथा अशा घडामोडी होण्याच्या दरम्यान आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा वसाका मजदूर युनियनने दिला आहे.

वसाका कारखाना परस्पर विक्री करण्याची प्रक्रिया राज्य सहकारी बँकेने सुरू केली असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने कामगार वर्ग अस्वस्थ आहे. इतक्या दिवस कारखान्यात घाम गाळत अनेक गळीत हंगाम यशस्वी केले. परंतु, या घामाचे दाम मिळत नसल्याने ते नाराज आहेत. वसाका कर्जाच्या खाईत अडकल्याने या कारखान्याची मालमत्ता राज्य सहकारी बँकेने जप्त केलेली आहे. कर्जाची वसुली करण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सभासद, कामगारांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Vasantdada Sahakari Sugar Factory
Agriculture Update : कळंब तालुक्यातील सात गावांत सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
Vasantdada Sahakari Sugar Factory
Nashik Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी ९३.४८ टक्के मतदान

देय रक्कम ३८ कोटी वसाका मजदूर युनियनद्वारा दिलेल्या पत्राच्या संदर्भानुसार सहायक कामगार आयुक्तांनी मागील वर्षाच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांशी केलेल्या पत्रव्यवहारानुसार कामगारांची कारखान्याकडे ३२ कोटी ६५ लाख ७९ हजार ९४७ थकित घेणी असल्याचे दिसते. या कारखान्याचे अवसायक अनिल देवकर यांच्या पत्रानुसार ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत निव्वळ देय पगार, ग्रॅज्युईटी रक्कम, रजा पगार, रिटेन्शन, पगारातील कपाती देणे, बोनस देणे अशी एकूण कामगार देय रक्कम ३८ कोटींपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या पत्रावरून कळते.

धाराशिव युनिट, अवसायक व वसाका मजदूर युनियनमधील त्रिपक्षीय करारानुसार यात कामगाराच घेणे बाकी आहे. या पार्श्‍वभूमीवर वसाका मजदूर युनियन कामगारांची थकित घेणी वसूल करण्यासाठी संघर्षाच्या तयारीत आहे. वसाका साखर कारखान्याचे हस्तांतरण होण्याआधी या कारखान्यातील कामगारांची थकित देणी दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, अशा घडामोडी होण्याच्या दरम्यान आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल
रवींद्र सावकार, कार्याध्यक्ष, वसाका मजदूर युनियन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com