Land Acquisition : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाला वाढीवर दर द्या

Pune-Nashik Industrial Expressway : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातून जाणाऱ्या प्रस्तावित पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाकरिता (राज्य महामार्ग विशेष क्रमांक ११) राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादनासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon

Pune News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातून जाणाऱ्या प्रस्तावित पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाकरिता (राज्य महामार्ग विशेष क्रमांक ११) राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादनासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. परंतु या भागातील जमिनीचा रेडीरेकेनर दर कमी असल्याने महामार्ग जात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना अत्यंत कमी रक्कम मिळणार आहे.

त्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, शासनाने रेडीरेकनरच दर वाढवल्याशिवाय आम्ही आमची जमीन संपादन करू देणार नसल्याचा पवित्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Land Acquisition
Land Issue : महामार्गांच्या विळख्यात माळराने

याबाबत ८ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये भूसंपादन करण्यासाठी खेड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी खेड, शिरूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी पुणे शहर-शिरूर व आंबेगाव- जुन्नर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी आंबेगाव- जुन्नर यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

हा द्रुतगती महामार्ग आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी, धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, शिंगवे व भागडी या गावांतून जात आहे. या गावातील भूसंपादन करण्यात येणाऱ्या क्षेत्राचे गट नंबर व संपादित करण्यात येणारे क्षेत्र याची माहिती अधिसूचनेद्वारे दिली आहे.

Land Acquisition
Land Dispute : कहाणी ‘हायवे टच’ घराची!

या भागातील जमिनीचा रेडीरेकनर दर हा कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा अत्यंत कमी रक्कम मिळणार असल्याने संबंधित गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, शासनाने रेडीरेकनरच दर वाढविल्याशिवाय आम्ही आमची जमीन संपादन करू देणार नसल्याचा पवित्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात घोडनदी, तसेच डिंभे उजव्या कालव्यामुळे शेती बागायती झाली आहे. शेतकरी बाराही महिने विविध पिके घेऊन चांगले उत्पन्न घेत आहे. अगोदरच या भागातील अनेक शेतकऱ्यांची जमीन पुनर्वसनामध्ये गेली आहे. या भागातून बेल्हे- जेजुरी व अष्टविनायक रांजणगाव- ओझर हे दोन महामार्ग गेल्याने जमिनीचे दर गगनाला भिडले आहे. प्रति एकरला ३० ते ४० लाख रुपये दर मिळत आहे, परंतु या भागातील रेडीरेकेनर दर हा तीन ते चार लाख प्रति एकर आहे. त्याच्या चार पट म्हणजे प्रति एकरला १२ ते १६ लाख रुपये मिळणार आहे. हा दर प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा खूप कमी आहे. रेडीरेकेनरचा दर वाढवल्यास मिळणाऱ्या पैशातून संबंधित शेतकरी दुसरीकडे जमिनी घेऊन शेती करू शकेल. त्यामुळे शासनाने रेडीरेकनरचा दर वाढवावा, अन्यथा बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- अनिल वाळुंज, माजी सरपंच, पोंदेवाडी (ता. आंबेगाव)
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. बाधित शेतकऱ्यांना त्या गावातील रेडीरेकेनरच्या चार पट रक्कम किंवा मागील तीन वर्षांत त्या गावात जमिनीचे झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या बाजारभावाचा तीन वर्षांचा सरासरी बाजारभाव किंवा रेडीरेकेनर दर जास्त असेल, त्याच्या चार पट रक्कम त्या गावातील शेतकऱ्यांना दिली जाते. जमिनीच्या बहुतांशी खरेदी-विक्री व्यवहारात स्टॅम्प ड्युटी कमी लागावी म्हणून अनेकदा व्यवहाराच्या प्रत्यक्ष रकमेपेक्षा कमी रक्कम दाखवली जाते. त्यामुळे त्या गावातील रेडीरेकनरचा दर कमी निघतो.
- गोविंद शिंदे, उप विभागीय अधिकारी, आंबेगाव-जुन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com