Crop Insurance : पीकविमा द्या, अन्यथा १२ टक्के व्याजाने वसुली

Crop Insurance Compensation : ९ पीकविमा कंपन्यांना कृषी विभागाने नोटिसा काढून तातडीने विमा रक्कम जमा केली नाही, तर १२ टक्के व्याजाने वसुली करू, तसेच कडक प्रशासकीय कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीच्या सूचना दिल्यानंतर विमा मंजूर होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ९ पीकविमा कंपन्यांना कृषी विभागाने नोटिसा काढून तातडीने विमा रक्कम जमा केली नाही, तर १२ टक्के व्याजाने वसुली करू, तसेच कडक प्रशासकीय कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

तसेच कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून या कंपन्यांनी पैसे थकविल्याची माहिती देत या कंपन्यांना सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मध्य प्रतिकूल परिस्थितीमुळे सूचना प्राप्त झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना २१०५.१४ कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मंजूर झाली आहे. यापैकी ८३१ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपन्यांनी दिलेले नाहीत.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपनीचे कार्यालय बंद; फौजदारी गुन्हे दाखल करा

त्यामुळे कृषी आयुक्तालयातून संबंधित विमा कंपन्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या ओरिएंटल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स, एसबीआय इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या पीकविम्याबाबत मार्गदर्शक सूचना २०२० मध्ये जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यांच्या आत नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.

Crop Insurance
Rabi Crop Insurance : रब्बी पिकांचे ३ लाख ८७ हजारांवर विमा प्रस्ताव

अन्यथा, उशिरा होणाऱ्या रकमेवर विमा कंपन्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १२ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र व राज्य सरकारचा विमा हप्ता दिला आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा.

अन्यथा, नियमाप्रमाणे १२ टक्के व्याजदराप्रमाणे विलंब शुल्कासह भरपाई द्यावी. तसेच नुकसान भरपाई देताना विलंब झाल्यास आपल्याविरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असेही नोटिशीत म्हटले आहे. कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी ही नोटीस बजावली असून, विमा कंपन्यांना हा इशारा समजाला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com