Biodiversity Park : उत्तनमधील जैवविविधता उद्यानाचा मार्ग मोकळा

Bhayandar Municipal Council : उत्तन येथील ३१ हेक्टर सरकारी जागेवर बायोडायव्हर्सिटी गार्डन अर्थात जैवविविधता उद्यान निर्माण करण्याचा मिरा-भाईंदर महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Biodiversity Park
Biodiversity ParkAgrowon
Published on
Updated on

Bhayandar News : उत्तन येथील ३१ हेक्टर सरकारी जागेवर बायोडायव्हर्सिटी गार्डन अर्थात जैवविविधता उद्यान निर्माण करण्याचा मिरा-भाईंदर महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. निसर्गाचा ढासळता समतोल जपण्यासाठी व तरुण पिढीला निसर्गाची ओळख व्हावी, यासाठी ही जागा जैवविविधता उद्यानासाठी आरक्षित करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता ही जागा महसूल विभागाकडून लवकरच महापालिकेकडे हस्तांतर होणार आहे.

उत्तन व आसपासचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. शिवाय हा परिसर पर्यटन केंद्र म्हणूनही घोषित झाला आहे. उत्तनच्या केशवसृष्टीलगत सर्व्हे क्र. ३५२ ही सरकारी जागा हरित विभागात समाविष्ट आहे.

त्यावर जैवविविधता उद्यान साकारण्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला आहे. परंतु त्यासाठी उत्तन परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात ही जागा उद्यानासाठी आरक्षित करणे व आराखड्यात त्यानुसार फेरबदल करून त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर करवून घेणे आवश्यक होते.

Biodiversity Park
Village Biodiversity : गावातील जैवविविधता जपण्याची जबाबदारी

महापालिकेने या सरकारी जागेतील ३१ हेक्टर जागा जैवविविधता उद्यानासाठी राखीव करण्याचा प्रस्ताव सरकारकडे यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाठवला होता. त्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

त्याबाबतची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेने या जागेची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच मागणी केली आहे. आता आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे ही जागा महसूल विभागाकडून लवकरच महापालिकेकडे मोफत हस्तांतर होणार आहे.

Biodiversity Park
Biodiversity Council : जैववैविध्य परिषदेतील भले-बुरे...

या जैवविविधता उद्यानात निसर्गातील सर्व घटक एकत्रितपणे पाहायला मिळतील व पर्यायाने निसर्गाचा समतोल साधता येईल, अशी महापालिकेची संकल्पना आहे. त्यानुसार या उद्यानात वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.

बोटॅनिकल गार्डन, बटरफ्लाय गार्डन, रॉक गार्डन, बांबू गार्डन, प्रदर्शन केंद्र, निसर्गाच्या विविध अंगांची माहिती देणारे केंद्र, मुलांना खेळण्यासाठी मैदान, ट्रेकिंची आवड असणाऱ्यांसाठी नेचर ट्रेल, पर्यावरण रक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तिवरांच्या जंगलातून फेरफटका मारण्यासाठी मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक, उंचावरून निसर्ग न्याहाळण्यासाठी मचाण आदी आकर्षणांचा या उद्यानात समावेश असणार आहे.

पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व अपारंपरिक विजेचा वापर करणारे सौरदिवेदेखील उद्यानात बसविण्यात येणार आहेत. उद्यानासाठी राज्य पर्यटन विभागाकडे निधीची मागणी पालिकेकडून केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com