Crop Insurance : एक रुपयाच्या पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपयांची वसुली ; कृषिमंत्र्यांकडून गंभीर दखल

Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकच्या रकमेची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Pune News : गेल्यावर्षी प्रमाणाचे खरीप हंगाम २०२४ साठी राज्य सराकार यंदाही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना राबवत आहे. मात्र, सीएससी केंद्र धारकांकडून पीकविम्याच्या अर्जासाठी ५० ते १०० रुपयांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील पीकविम्यासंदर्भातील धक्कादायक माहिती 'ॲग्रोवन'चे प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी उघडकीस आणली आहे.

शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकच्या रकमेची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी एक रुपया लागेल, असे सांगत आहे. वास्तविकपणे मात्र शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांची मागणी केली जात आहे. पंतप्रधना पीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या पिकांना विम्याचे संरक्षण देणारी योजनाआहे.

सीएससी केंद्राना ४० रुपये मानधन निर्धारित

सरकारने विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्राना प्रति शेतकरी ४० रुपये मानधन निर्धारित केले आहे. हे मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागाला दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा अर्ज भरताना केवळ एकच रुपया शुल्क म्हणून भरायचे आहे. मात्र, असे असूनही सीएससी केंद्रांकडून जादा रकमेची मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे.

पीकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून रोजरोजपणे अधिकच्या रकमेची मागणी होत असल्याने कृषीमंत्री, महसूल मंत्री याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Crop Insurance
Crop Insurance : एक रुपयात पीकविमा हे केवळ मृगजळच

कृषीमंत्र्याकडून गंभीर दखल

दरम्यान, या बातमीची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून अधिकाऱ्यांना संबंधित सीएससी केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील त्यांनी ग्रामविकास विभागाकडे तक्रारीबाबत सांगितल्याचे कळते आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वत: कृषिमंत्र्यांनी लक्ष घातले असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : पीकविमा योजना हवी अधिक कार्यक्षम अन् पारदर्शी

कारवाईचे आश्वासन

पीकविमा अर्जासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करणाऱ्या केंद्रांवर कारवाईचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

येथे तक्रार करता येणार

पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून सीएससी केंद्रांकडून अधिकच्या रकमेची मागणी होत असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पीकविम्यासंदर्भात ९८२२६६४४५५ आणि ९८२२४४६६५५ हे दोन क्रमांकांवर तक्रार करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com