Rabi Crop Insurance : एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा रब्बी पीकविमा योजनेत सहभाग

Rabi Season 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ८५२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ८५२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी ४ लाख २२ हजार २७७ अर्ज केले आहेत. २ लाख २३ हजार ४९० हेक्टर क्षेत्राचा या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे ५ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत ३ लाख ४१ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक ज्वारीचेच क्षेत्र आहे. मात्र गतवर्षीपेक्षा ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. हरभरा, गहू, मक्याचे क्षेत्रही यंदा अधिक आहे.

Crop Insurance
Mango Crop Insurance : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

नैसर्गिक कारणाने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवत आहेत. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमाहप्ता असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकार भरत आहेत. एक रुपयात विमा योजना केल्यापासून विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे.

यंदा रब्बी हंगामासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर (रविवार) आहे. आजपर्यंत योजनेत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ८५२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी ४ लाख २२ हजार २७७ अर्ज केले आहेत.

Crop Insurance
PM Crop Insurance Scheme : राज्यात पीक विम्यासाठी ४१ लाख अर्ज

२ लाख २३ हजार ४९० हेक्टर क्षेत्राचा या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. शेतकऱ्यांनी १ लाख १७९ हजार ८५२ रुपयांचा हप्ता भरला असून, केंद्र व राज्य सरकारने मिळून राज्य सरकारने १०७ कोटी ७६ लाख ४८ हजारांचा हप्ता भरला असून, १२८१ कोटी ६७ लाख ३० हजार ६२३ रुपये संरक्षित झाले आहेत. यंदा गतवर्षीपेक्षा अधिक शेतकरी सहभाग वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

शेतकरी सहभाग (कंसात हेक्टर क्षेत्र)

अकोले ७,८४३ (११,४३६)

जामखेड १७,७९३ (२५८१७)

कर्जत २९,५९६ (१६४३३)

कोपरगाव ८,०९१ (९,३५१)

अहिल्यानगर १०,३३५ (१५,०८६)

नेवासा १४,३४४ (१५,९५३)

पारनेर २५,६९३ (३३,८७१)

पाथर्डी १८,०२३ (२१,२००)

राहाता ८,९९१ (१०,६१५)

राहुरी १५,३४६ (१५,६६८)

संगमनेर १९,८३७ (२२,३०६)

शेवगाव ७,१३९ (८,६५०)

श्रीगोंदा ८,६४६ (९,५४२)

श्रीरामपूर ६,५२५ (७,५६५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com