
Pune News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या म्हणजेच गुरुवारूवारीही दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीतपणे चाललेले नाही. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस गदारोळात गेल्यानंतर आजही दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब करावे लागले. काँग्रेचे नवनियुक्त खासदार प्रियंका गांधी वढेरा आणि रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी शपथ घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. यानंतर अध्यक्षांनी तहकूब केले.
गेल्या आठवड्यात लोकसभा पोटनिवडणुकीच्या वायनाड आणि नांदेड मतदारसंघाचा निकाल आला. यात वायनाडमधून गांधी घराण्यातील तिसरी व्यक्ती प्रियंका गांधी वढेरा खासदार झाल्या. तर नांदेड मतदारसंघातून रवींद्र वसंतराव चव्हाण निवडून आले होते. आज लोकसभेत या दोन्ही नवनियुक्त खासदारांचा शपथ विधी झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना शपथ दिली.
यानंतर गौतम अदानी यांच्यावरील आरोप, उत्तर प्रदेशातील संभलमधील गदारोळ, मणिपूर हिंसाचार, बेरोजगारी आणि महागाई यासह अनेक मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावरून अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना सातत्याने संयम राखण्यास सांगताना नियमांची आठवण करवून दिली. तसेच आपण सर्व विषयांवर सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देवू. पण सदस्यांनी आपल्या जागेवरून बोलावे असे आवाहन केले होते. या आवाहनानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचेही कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. (Parliament Winter Session)
वायनाडमधून दणदणीत विजय
वायनाड जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांनी ४ लाख १० हजार ९३१ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६ लाख २२ हजार ३३८ मते मिळाली. तर माकपचे सत्यन मोकेरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून त्यांनी २ लाख ११ हजार ४०७ मते मिळाली. तर भाजपच्या हरिदास यांना १ लाख ९ हजार ९३९ मते मिळाली.
नेहरू-गांधी कुटुंबातील १६ वी सदस्य
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी खासदार म्हणून शपथ घेतली. प्रियांका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली. सध्या लोकसभेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी भाऊ बहिण सदस्य असून आई सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार आहेत.
याआधी १९५३ पर्यंत जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांची भाऊ-बहीण सभागृहात होते. आता ७१ वर्षांनंतर नेहरू-गांधी घराण्यातील भाऊ-बहीण पुन्हा एकत्र सभागृहात दिसले आहेत. तर प्रियंका गांधी नेहरू-गांधी कुटुंबातील १६ वी सदस्य खासदार ठरल्या आहेत. (Priyanka Gandhi takes MP Oath)
नांदेडमध्ये चव्हाणांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी विजय खेचून आणला. त्यांचा अटीतटीच्या लढतीत १ हजार ४५७ मतांनी विजय झाला. पण विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.