Opposition Demands: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजेच मंगळवारी (ता.२१) गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत त्यावर इंडिया आघाडीकडून चर्चेची मागणी करण्यात आली. .दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभा आणि राज्यसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवर चर्चा घेण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना विविध मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. परंतु विरोधक मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे गोंधळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले..Parliament Monsoon Session 2026: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत प्रचंड गदारोळ, नीट पेपरफुटी, राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक.दुसरीकडे, राज्यसभेत सभागृह नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात करताच विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेतही गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आणि कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले..Parliament Monsoon Session 2026: गदारोळामुळे संसदेचे कामकाज पहिल्याच दिवशी तहकूब.दरम्यान, केंद्र सरकार आज राज्यसभेत 'राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, २०२६' मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकाद्वारे 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला वैधानिक संरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. विधेयकानुसार, राष्ट्रगीत गायनात अडथळा निर्माण करणे किंवा कोणत्याही प्रकारे त्याचा अपमान करणे हा कायद्याने शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. तसेच लोकसभेत आज सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) दुरुस्ती विधेयक, २०२६ विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडले जाणार आहे..सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर चर्चा घेण्याची मागणी करत दोन्ही सभागृहांत गदारोळ केला होता. 'नीट' प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन यांसह विविध विषयांवर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यामुळे पहिल्या दिवशीही संसदेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले होते..पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्याने संसदेचे नियमित कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.