
Parbhani News : परभणी जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे २०२४ -२५ च्या रब्बी हंगामात कांदा ४१५ हेक्टर, टोमॅटो ३२५ हेक्टर, बटाटा २७ हेक्टर लागवड झाली आहे. यंदा कांदा, टोमॅटो, बटाट्याच्या लागवडीत २०२३-२४ च्या तुलनेत वाढ झाली असली तरी या तीन पिकांच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत घट आहे. २०२३-२४ मध्ये कांदा २७७ हेक्टर, टोमॅटो २१० हेक्टर, बटाटा २३ हेक्टर लागवड झाली होती, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
२०२४ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, विंधन विहिरी, लघू तलाव, मध्यम प्रकल्प, तसेच मोठ्या प्रकल्पामध्ये सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांसह मासोळी, करपरा हे मध्यम प्रकल्प तसेच लघू तलावातून यंदा सिंचन आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे यंदा कांदा, टोमॅटो, बटाटा या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
मागील काही वर्षात सिंचन विहिरी, विंधन विहिरींची संख्या वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाच्या शेततळ्याद्वारे संरक्षित पाणीसाठा निर्माण केला आहे. सिंचनासाठी विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दररोजचे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवड क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ झाली आहे.
कांदा, टोमॅटो ही पारंपरिक भाजीपाला पिके तसेच किफायतशीर ठरत असल्यामुळे शेतकरी बटाटा लागवड करत आहेत. परभणी जिल्ह्यात कांद्याचे सरासरी क्षेत्र ६२० हेक्टर आहे. २०२१-२२ मध्ये, ५५०.८० हेक्टर, २०२२-२३ मध्ये ५७१ हेक्टर, २०२३-३४ मध्ये २७७ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. जिल्ह्यात टोमॅटोचे सरासरी क्षेत्र ५२० हेक्टर आहे.
२०२१-२२ मध्ये १६१.३० हेक्टर, २०२२-२३ मध्ये १६३ हेक्टर, २०२३-२४ मध्ये २१० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली होती. जिल्ह्यात बटाट्याचे सरासरी क्षेत्र ४० हेक्टर आहे. २०२१-२२ मध्ये २६ हेक्टर, २०२२-२३ मध्ये ३० हेक्टर, २०२३-२४ मध्ये २३ हेक्टरवर बटाटा लागवड झाली होती. पालेभाज्या, वेलवर्गीय, शेंगवर्गीय भाजीपाला, मिरची, लसूण आदी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
परभणी जिल्हा २०२४-२५ कांदा, टोमॅटो, बटाटा लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका कांदा टोमॅटो बटाटा
परभणी ११५ ५५.२० ६.६०
जिंतूर ५७ ६१.३० ४.३०
सेलू ४० ३२.३० २.००
मानवत ३५ ३१.३० ४.००
पाथरी ३५ ३५.९० ३.५०
सोनपेठ ३६ २२.५० ००
गंगाखेड ३२ २७.६० ३.५०
पालम ३५ ३३.५० २.४०
पूर्णा ३० २६.१० १.००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.