Heavy Rain Damage: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या

CropLoss Relief: महागाई वाढल्यामुळे शेती निविष्ठांवरील खर्चात वाढ झाली आहे.त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबद्दल परभणी जिल्ह्यातील ३१ मंडलातील बाधित शेतकऱ्यांना १७ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार वाढीव दराने, तसेच ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी.
Parbhani Farmers
Parbhani FarmersAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: महागाई वाढल्यामुळे शेती निविष्ठांवरील खर्चात वाढ झाली आहे.त्यामुळे यंदाच्या  खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबद्दल  परभणी जिल्ह्यातील ३१ मंडलातील बाधित शेतकऱ्यांना १७ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार वाढीव दराने, तसेच ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी.खरडून गेलेल्या जमिनीबद्दल मदत द्यावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

परभणी जिल्ह्यात यंदा जुलैमध्ये गुरुवार (ता.१७), मंगळवारी (ता.२२), रविवारी (ता.२७) हे तीन दिवस मिळून ३१ मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती, बहुवार्षिक पिकांचे अतोनात नुकसान झाले.

Parbhani Farmers
Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा पश्‍चिम विदर्भाला तडाखा

१७ जुलै ते २७ जुलै या १० दिवसांत जिल्ह्यातील पेडगाव,जांब, जिंतूर, वाघीधानोरा, चिकलठाणा, मोरेगाव, देऊळगाव-गात,मानवत या ८ मंडलात दोनवेळा, पाथरी तालुक्यांतील पाथरी,हादगाव,कासापुरी या ३ मंडलात तीनवेळा अतिवृष्टी झाली.

Parbhani Farmers
Heavy Rain Damage : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान

परभणी, परभणी ग्रामीण, झरी,सिंगणापूर, पिंगळी,टाकळी कुंभकर्ण, बोरी,दूधगाव, केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव, रामपुरी, बाभळगाव, सोनपेठ, पूर्णा, ताडकळस, चुडावा, कावलगाव या २० मंडलात एकवेळा अतिवृष्टी झाली.

३० मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार  खरीप २०२५ पासून अतिवृष्टी,पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार पीक नुकसानीबद्दल २ हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिके प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिके प्रतिहेक्टरी १७ हजार रुपये, बहुवार्षिक पिके प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे.

परंतु महागाईमुळे पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना १७ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ३ हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये,बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये,बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार मदत देण्यात यावी.

खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी अतिवृष्टीची नोंद झालेल्या व अतिवृष्टीची नोंद न झालेल्या मंडलात मदत देण्यात यावी.पाथरी तालुक्यात सतत अतिवृष्टी होत आहे. याबाबत अभ्यास गट नेमून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागण्या हेमचंद्र शिंदे,विश्वंभर गोरवे, नागनाथ गड्डीमे, मोहन काळे, अनिरुद्ध डुकरे, राजेंद्र जवळेकर आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com