Crop Loan Target : ‘डीसीसी’कडून पीककर्जाचे उद्दिष्ट साध्य

Parbhani DCC Bank : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वाटपाचे (१००.४४ टक्के) उद्दिष्ट साध्य केले आहे. पीककर्ज वाटपात दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७.९१ टक्के वाटप झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) खरीप हंगामात ३१ जुलैअखेर ७१ हजार ८४१ शेतकऱ्यांना ६१४ कोटी ६३ लाख रुपये (४०.६६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वाटपाचे (१००.४४ टक्के) उद्दिष्ट साध्य केले आहे. पीककर्ज वाटपात दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७.९१ टक्के वाटप झाले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकां (२२.२० टक्के), खासगी बँक (१७.४९ टक्के) पिछाडीवर आहेत.

परभणी जिल्ह्यातील बँकांना यंदाच्या खरिपात १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.३१ जुलैअखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा २१० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना बँकेने २१० कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज वाटप करुन उद्दिष्ट साध्य केले आहे.

Crop Loan
Crop Loan: नांदेडला पीककर्ज वाटपात राष्ट्रीय बँका अद्याप उदासीन

जिल्हा सहकारी बँकेच्या आजवरच्या पीककर्ज वाटपात ५५८ शेतकऱ्यांना २ कोटी ८७ लाख रुपये नवीन पीककर्ज देण्यात आले, तर ३८ हजार ८२६ शेतकऱ्यांनी २०८ कोटी ६ लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले. दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३३९ कोटी १३ लाख रुपये पैकी १९६ कोटी ३९ लाख रुपये वाटप केले आहे.

राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांचे ८२७.३३ कोटी पैकी १८३ कोटी ६८ लाख रुपये, खाजगी बँकांचे १३५ कोटी १४ लाख रुपये पैकी २३ कोटी ६३ लाख रुपये वाटप झाले आहे. जुलै अखेर ६ हजार ६८२ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७८ लाख रुपयांचे नवीन पीक कर्ज वाटप आहे.

Crop Loan
Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

एकूण ६५ हजार १५९ शेतकऱ्यांनी ५२७ कोटी ८५ रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतले आहे. २०२४ मध्ये ३१ जुलै अखेरपर्यंत ७० हजार ७४१ शेतकऱ्यांना ५५१ कोटी ६५ लाख रुपये (३७.५० टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.

जिल्ह्यात पीककर्ज वाटप ३१ जुलै २०२५ अखेर

एकूण पीककर्ज वाटप

उद्दिष्ट रक्कम: १,५११.६० कोटी

वाटप रक्कम: ६१४.६३ कोटी

वाटप टक्केवारी: ४०.६६%

शेतकरी लाभार्थी: ७१,८४१

नवीन पीककर्ज: ६,६८२ शेतकरी, ८६.७८ कोटी

नुतनीकरण : ६५,१५९ शेतकरी, ५२७.८५ कोटी

२०२४ मध्ये ३१ जुलैची स्थिती

वाटप रक्कम - ५५१.६५ कोटी

वाटप टक्केवारी - ४०.६६% (३७.५०%)

शेतकरी लाभार्थी - ७० हजार ७४१

Parbhani Crop Loan
Parbhani Crop LoanAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com