
Parbhani News : ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गंत परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत ४३ हजार ४३ हजार ७९६ अर्ज प्राप्त झालेले आहेत. आजवर थेट लाभ हस्तांतर प्रणाली (डीबीटी) व्दारे एकूण १८ हजार ८५१ लाभार्थ्यांना प्रत्येकी एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरण आहे.
या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी शहर महानगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या मार्फत आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत cmvayoshree.mahait.org या वेबसाइटवर४१ हजार ७९६ लाभार्थीचे अर्ज शासनास ऑनलाईनप्रणाद्वारे सादर करण्यात आलेले आहेत.
त्यापैकी २१ हजार ५७५ लाभार्थ्यांचे बँकखाते आधार संलग्न आहेत. ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र,द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते.
याअंतर्गंत वितरीत केलेल्या रकमेतून लाभार्थ्यांनी चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट व सर्व्हायकल कॉलर आदी साहित्य किंवा मनःस्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी डॉक्टराकंडून केलेल्या उपचार किंवा सबंधित दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तुंच्या पावत्या जवळच्या परभणी शहर महानगरपालिका, नगरपरिषदनगरपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास पावती सादर करावी. रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी तत्काळ बँक खाते आधारसंलग्न करावे आवाहन समाज कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.