Koyna Dam Tourism : कोयना धरण जलाशयात आता पॅरासेलींग, स्कुबा डायव्हिंग करण्यास परवानगी

Koyna Dam Water : सदर प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याच्यांद्वारे करण्यात येणार आहे.
Koyna Dam Tourism
Koyna Dam Tourismagrowon

Satara Aquatic Tourism : कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर मौजे मुनावळे ता. जावळी येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसीत करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात जलपर्यटन विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुरव्याला यश आले आहे.

कोयना धरण "शिवसागर जलाशय' यावर मौजे मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याबाबत त्यानुसार प्रकल्पाची व्यवहारता, वित्तीय बाबी तपासून अनुसरुन शासनाने मान्यता दिली आहे.

सदर प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याच्यांद्वारे करण्यात येणार आहे. बांधकामाचा खर्च हा पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास अदा करणार आहे. जल पर्यटनाशी संबंधित कामकाज तसेच प्रकल्पाचे प्रचालन हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाबरोबर करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारातील तरतूदीनुसार करण्यात यावी असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Koyna Dam Tourism
Koyna Earthquake : कोयनेतील तो थरकाप उडवणारा भूकंप PHOTOS

मौजे मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याकरीता प्रकल्पास रु.४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिला टप्पा ८ महिन्यात आणि दुसरा टप्पा २० महिन्यात पुर्ण करण्यात यावा. जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याची कार्यवाही ही कोयना धरण (शिवसागर जलाशयाच्या) 'अ' वर्ग प्रतिबंधित क्षेत्रात होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. पर्यावरणाची हानी होणार नाही तसेच जलपर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेऊन जलाशयात मलजलप्रक्रिया केंद्र उभारणे, पर्यावरणस्नेही बोटींचा वापर इ. च्या माध्यमातून घेण्यात यावी, शासनाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे.

पहिल्या टप्यातील खर्चासाठी/सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु.१३.६१ कोटी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासनाने मान्यता दिली आहे. गुणनियंत्रण यंत्रणेद्वारे कामाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी केल्याचा प्रमाणित अहवाल तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा सचित्र दाखला आणि निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात यावे. तद्नंतर पुढील उर्वरित निधी वितरित केला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com