CIDCO NAINA Project
CIDCO NAINA ProjectAgrowon

NAINA Protest : नैनाविरोधी आंदोलनामुळे पनवेलमध्ये संघर्षाची चिन्हे

NAINA Project Update : नैनाविरोधात उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता, मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न मिळाल्‍याने प्रकल्पग्रस्तांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
Published on

Panvel News : नैनाविरोधात उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता, मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न मिळाल्‍याने प्रकल्पग्रस्तांमधून संताप व्यक्‍त होत आहे. उपोषणकर्ते अनिल नामदेव ढवळे, दमयंती नामदेव भगत, मधुकर महादेव पाटील, समीर पांडुरंग पारधी यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असून मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

नैनाविरोधी आंदोलनात सोमवारी (ता. ११) शेकडो प्रकल्पग्रस्त महिला एकत्र आल्या होत्या. नैना हटवल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका घेत त्‍यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्‍याने उपोषण स्थळाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

CIDCO NAINA Project
Farmer Protest : नेवासा फाटा येथे शेतकरी संघटनेचे ‘रास्ता रोको’

प्रकल्पग्रस्त महिला ज्योती जनार्दन चोरघे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्‍याने वातावरण आणखी तापले होते. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहा ते बारा पोलिस वाहने, सहायक आयुक्तासह पनवेलमधील सर्वच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते.

CIDCO NAINA Project
Kisan Sabha Protest : किसान सभेचा आक्रोश मोर्चा

दरम्यान सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून २३ डिसेंबरनंतर या संदर्भात बैठक घेवू असे सांगितले आहे. तर आंदोलकांना दिलासा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी नागपूर अधिवेशनाच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. विरोधी पक्षनेत्यांना भेटून नैनाविरोधी भूमिका मांडणार असल्‍याचे सांगण्यात आले.

उपोषणबाबत आमदार महेश बालदी म्‍हणाले, उपोषण सुरू असलेल्या लोकांकडे कोणीही फिरकणार नाही. त्यांना चर्चेला बोलावतील, असेही वाटत नाही. सकाळी खाऊन जायचे दोन तास बसायचे, पुन्हा दुपारी जेवायेच असे सुरू आहे. हे सर्व काही ढोंग असल्‍याची टीका त्‍यांनी केली.

आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी नैनाविरोधी सुरू असलेल्या उपोषणाकर्त्यांबाबत ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते पाहून दोन्ही आमदार जनतेचे प्रतिनिधित्व करतात की जनतेच्या विरोधात प्रतिनिधित्व करतात, हा प्रश्न उपस्थित होतो. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असताना, त्‍यांच्याबद्दल अपशब्‍द वापरणे उद्वेगजनक आहे.
बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com