Agri Engineering Technology : कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी चार कंपन्यांशी करार

PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नवीकरणीय ऊर्जा व कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने विकसित केलेल्या विविध कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी चार नामांकित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
PDKV Akola
PDKV Akola Agrowon
Published on
Updated on

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नवीकरणीय ऊर्जा व कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने विकसित केलेल्या विविध कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी चार नामांकित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालय सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सौर प्रकाश सापळा, हवेशीर कांदा साठवणूक स्ट्रक्चर, हिरवा चारा निर्मितीसाठी हायड्रोपोनिक स्ट्रक्चर व प्राणी प्रतिबंधक कीटक सापळा या तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी हे करार झाले.

PDKV Akola
PDKV Akola : पंदेकृवि, सिंजेंटा फाउंडेशन, सिंजेंटा इंडिया लि. यांच्यात सामंजस्य करार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. प्रमुख म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. अशोक मस्के, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. मृदुलता देशमुख, डॉ. अनिल कांबळे, प्रा. अजय तळोकार, डॉ. राजेश मुरूमकर, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. किशोर बिडवे, डॉ. किशोर घरडे, डॉ. संदीप कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. सुचिता गुप्ता यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देत, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा या साधनसामग्रीचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. काळबांडे यांनी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढत्या मागणीची माहिती देत, कीटक व प्राणी प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी गरजेची असल्याचे स्पष्ट केले. निर्मात्यांच्या वतीने राजवंश शर्मा यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यापीठाशी पूर्वीच्या सकारात्मक सहकार्याचा उल्लेख केला.

PDKV Akola
PDKV Akola: ‘पंदेकृवि’चे तीन पीक वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

या कार्यक्रमात प्राणी प्रतिबंधक सौर कीटक सापळा निर्मितीबाबत जी. टी. बायोसायन्स यवतमाळ, सौर प्रकाश कीटक सापळा निर्मितीसाठी साई ॲग्रोटेक यवतमाळ, हवेशीर कांदा साठवणूक स्ट्रक्चर हार्वेस्ट अॅग्रो अकोला, हायड्रोपोनिक स्ट्रक्चर (हिरवा चारा निर्मितीसाठी) मूनलाइट एंटरप्राइजेस अकोला यांच्यासोबत करार झाला.

संशोधन संचालक डॉ. खर्चे यांनी कृषी अभियांत्रिकीचे महत्त्व अधोरेखित करीत कृषीमधील तंत्रज्ञानवाढीचा आढावा दिला. कुलगुरू डॉ. गडाख यांनी कृषी संयुक्त संशोधन परिषदेमध्ये अभियांत्रिकी विभागाच्या कामगिरीचे कौतुक करीत या तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची गरज व्यक्त केली. डॉ. राजेश मुरूमकार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com