Paani Panchayat : समन्यायी पाणीवाटपासाठी झटणारी पाणी पंचायत

त्यांचा विश्‍वास आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दोनशेपेक्षा जास्त दुष्काळग्रस्त गावांमध्ये सार्थ ठरताना दिसतो. त्यांच्या विचारावर ग्रामगौरव प्रतिष्ठान तितक्याच जोमाने कार्यरत ठेवण्यामध्ये कल्पनाताई व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे.
Paani Panchayat
Paani PanchayatAgrowon
Published on
Updated on

सतीश कुलकर्णी

किमान महाराष्ट्रात तरी विलासराव साळुंखे म्हटले की पाणी पंचायत, हा शब्द आठवल्याशिवाय राहत नाही. एखादी कर्तृत्ववान व्यक्ती जोपर्यंत कार्यरत असते, तोपर्यंत त्यांचे काम रुजणे, वाढणे आणि फोफावणे ही बाब साहजिकच मानली जाते. मात्र त्या व्यक्तीच्या पश्‍चात त्याचा विचार, काम आणि तत्त्वे कशी वाढतात, यावरच त्या व्यक्तीचे मोठेपण अवलंबून असते. अनेक वेळा काही माणसे स्वतः खूप चांगले काम करतात किंवा लोकांकडून करून घेऊ शकतात.

Paani Panchayat
Commercial Crop : व्यावसायिक पिकांत गणेश झाले ‘प्रगतिशील’ शेतकरी

मात्र त्यांचे काम त्यांच्या पुढे फारसे जात नाही. अशा संस्थाही स्थिर होतात, थांबतात. कदाचित बंदही पडतात. पाणी पंचायत मात्र याला अपवाद ठरली. १९७२ च्या दुष्काळापासून रुजत गेलेले पाणी पंचायतीचे बीज विलासरावांच्या पश्‍चात आजही सर्वसामान्यांच्या मनामध्ये तितक्याच जोमाने वाढत असल्याचा अंदाज ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या कामातून येत राहतो.

हे सारे कसे शक्य झाले, या विषयावर विलासरावांच्या पत्नी कल्पनाताईंना बोलते केले. त्या म्हणाल्या, ‘‘विलासराव स्वतः पाणी पंचायतीचा विचार जगले. सुरुवातीपासून त्यांचा कारखाना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पुरंदरमधील दुष्काळग्रस्त गावे असे दोन भागांत विभाजन झाले होते. पुढे पुढे तर केवळ पाणी पंचायत, समन्यायी पाणीवाटप याच गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले. तोच त्यांचा संसार होता. विलासरावांचं निधन झाल्यानंतर त्यांचं काम पुढं नेण्याचं मोठं आव्हान आम्हा सर्वांसमोर होतं. तेव्हा २००२ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पाणी समस्येवर काम सुरू होतं.’’

पुरंदर हा तालुका अत्यंत वैविध्यपूर्ण पर्जन्यमानाचा आहे. येथे एका भागामध्ये केवळ वार्षिक ३०० मिलि पाऊस पडतो, तर एका भागामध्ये कोकणासारखा १६०० ते २००० मिलि पाऊस कोसळतो. अगदी येथे काळदरी खोऱ्यामध्ये भात पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, अशा भागामध्ये संस्थेने अधिक काम केले आहे...

(सविस्तर लेख वाचा दिवाळी अंकात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com