Water Storage : सातपुड्यातील प्रकल्पांतील जलसाठा घटला

Water Stock : सातपुड्यालगतचे खानदेशातील विविध प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहे. त्यातून विसर्गही डिसेंबरमध्ये सुरू होता.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सातपुड्यालगतचे खानदेशातील विविध प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहे. त्यातून विसर्गही डिसेंबरमध्ये सुरू होता. परंतु फेब्रुवारी व मार्चमध्ये या प्रकल्पांतील जलसाठा घटला आहे. नंदुरबारातील चिरडे, दरा, सुसरी, धुळ्यातील अनेर, जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातील गूळ, यावलमधील सुकी, मोर, रावेरातील मंगरूळ, अभोडा आदी मध्यम प्रकल्पामुळे अनेक केळी उत्पादक गावांना दिलासा मिळात आहे.

त्यातून विसर्ग डिसेंबरच्या सुरवातीसही सुरू होता. सातपुडालगतचा भाग सुपीक व काळ्या कसदार जमिनीचा आहे. पण या भागात मध्यंतरी कमी पावसाने शिवारातील जलसाठे कमी झाले होते. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने जलसाठे मुबलक आहेत. परंतु पाणीउपसा महिनाभरात वाढल्याने जलसाठा सध्या ५५ टक्क्यांपर्यंत आहे.

Water Storage
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील साडेसातशेवर लघू प्रकल्पांत केवळ ३५ टक्के उपयुक्त पाणी

खानदेशातील पश्चिम भागातील प्रकल्पही यंदा बऱ्यापैकी भरले होते. सातपुड्यातील सर्वच प्रकल्प मागील चार - पाच वर्षे भरले आहेत. नंदुरबारमध्ये शहाद्यातील चिरडे, दरा, सुसरी हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. तसेच तळोद्यातील लघु प्रकल्प, तलावांतही मुबलक जलसाठा आहे. धुळ्यात शिरपुरातील विविध प्रकल्पांतही जलसाठे मुबलक होते. त्यात शिरपुरातील अनेर प्रकल्प १०० टक्के भरला. जळगाव जिल्ह्यात चोपड्यातील सातपुडालगत गूळ व अन्य लघु प्रकल्प आहेत.

रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील गारबर्डी किंवा सुकी, मोर या प्रकल्पांत जलसाठा १०० टक्के होता. सुकी, मंगरूळ, अभोडा हे प्रकल्प मागील चार वर्षे १०० टक्के भरले होते. केळी व अन्य पिकांच्या सिंचनासाठी स्त्रोत उपलब्ध होतात. परंतु चोपड्यातील गूळ, शहाद्यातील सुसरी, दरा या प्रकल्पांत मागील वेळेस जलसाठा कमी होता. रावेरात भोकर नदीवरील मंगरूळ हा लघुसिंचन प्रकल्प यंदाही चांगल्या पावसाने भरून वाहत होता.

Water Storage
Water Storage : सांगली जिल्ह्यात जलसाठ्याचा स्तर घसरला; फक्त ३७% साठा शिल्लक

या प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून नदीपात्रात आले. नदीही अनेक दिवस प्रवाही होती. सातपुड्यातील नद्या प्रवाही राहिल्याने या नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरात असलेल्या गावांच्या भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली.

सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्यास सातपुड्यातील व लगतचे प्रकल्प भरतात. यंदाही ऑगस्टमध्येच अनेक प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागले होते. या भागातील सर्व प्रकल्प केळी पट्ट्यासाठी महत्त्वाचे आहेत.

पाणी मागणी अधिक

शहाद्यातील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, गोगापूर, लोणखेडा, शिरपुरातील तोंदे, हिसाळे, तरडी, बभळाज, अजनाड, चोपड्यातील नारोद व लगतची गावे, यावलमधील न्हावी, वड्री आदी गावे, रावेरातील मंगरुळ, पिंप्री, केऱ्हाळा बुद्रूक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, कर्जोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना सातपुड्यातील प्रकल्पांचा फायदा होतो.

या गावांतील भूगर्भातील पातळी वाढून तेथील विहिरी कूपनलिकांची पातळी वाढण्यास मदत होते. यात पाण्याची मागणी, उपसा वाढला आहे. उष्णताही फेब्रुवारीत वाढली. यामुळे त्यातील जलसाठा घटत आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत या प्रकल्पांतील जलसाठा मात्र बरा आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com