Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉरबाबत सरकार सकारात्मक

Pandharpur Temple Development : येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन परिसरात कॉरिडॉर (विकास आराखडा) तयार करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू आहे.
Pandharpur Corridor Plan
Pandharpur Corirdor Agrowon
Published on
Updated on

Pandhar News : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येणाऱ्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन कॉरिडॉरचे काम केले जाईल, असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिले.

येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन परिसरात कॉरिडॉर (विकास आराखडा) तयार करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही कॉरिडॉरबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. मंदिर परिसरातील काही स्थानिक दुकानदारांनी मंदिर परिसरातील कॉरिडॉरला विरोध सुरू केला आहे.

Pandharpur Corridor Plan
Pandharpur Maghi Wari : माघवारीनंतर पंढरपुरात स्वच्छता मोहीम

या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील दुकानदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आमदार आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता.१३) येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी स्थानिक दुकानदारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.

आमदार आवताडे म्हणाले, पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकार कॉरिडॉर राबविण्यावर ठाम आहे. कॉरिडॉरचे काम सुरू करण्यापूर्वी मंदिर परिसरातील दुकानदारांची मते आजमावणे माझे पहिले कर्तव्य आहे. चुकीच्या पद्धतीने कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. विधानसभेत कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली तर त्यामध्ये स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांचे प्रश्न प्राधान्याने मांडणार आहे.

Pandharpur Corridor Plan
Pandharpur-Lonand Railway : बाधित गावांची पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष पाहणी

येथील लोकांना वारवर सोडणार नाही. प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही. परंतु जे इथल्या लोकांचे मत आहे, तेच माझे देखील मत आहे. परंतु कॅारिडॉरला विरोध आहे, असा याचा अर्थ नाही.

कॉरिडॉर करताना कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने तो करावा. माध्यमांनी देखील कॉरिडॉरला पंढरपूरकरांचा विरोध आहे, अशी आवई उठवू नये. पंढरपूर शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला किंवा योजनेला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार आवताडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com