Landslide Victims House : भूस्खलन पीडितांसाठी शंभर घरे बांधणार

Rahul Gandhi : वायनाडची भूस्खलन घटना न भूतो न भविष्यती अशी घडली असून दिल्लीने मदत करताना याचे भान राखले पाहिजे, असे मत आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Landslide
LandslideAgrowon
Published on
Updated on

Wayanad News : वायनाडची भूस्खलन घटना न भूतो न भविष्यती अशी घडली असून दिल्लीने मदत करताना याचे भान राखले पाहिजे, असे मत आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हा मुद्दा आपण दिल्ली आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे मांडू. कारण अशा प्रकारचे संकट यापूर्वी कधीही घडले नव्हते आणि पाहिले नव्हते. त्यामुळे मदत करताना वेगळा विचार करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाकडून वायनाड येथे शंभराहून अधिक घरे बांधली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Landslide
Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, २६ जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे काल वायनाड येथे दाखल झाले. त्यांनी भूस्खलन पीडित नागरिकांशी भेटून त्यांचे सांत्वन केले तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्याची माहिती घेतली.

Landslide
Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

राहुल गांधी यांनी वायनाड येथे मुक्काम केला. आज जिल्हा प्रशासन, ग्राम पंचायतीचे अधिकारी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना या घटनेत झालेले मृत्यू, नष्ट झालेले घर तसेच बचाव कार्याच्या नियोजनाची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी भूस्खलनपीडित लोकांसाठी शंभराहून अधिक घर काँग्रेसकडून बांधली जातील. तसेच पीडितांना सर्वतोपरी मदत करू, असे आश्‍वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com