Crop Demonstration Program : व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीची गरज

Dr. Pramod Rasal : बाजारपेठेतील निरीक्षणे व सक्षम विक्री व्यवस्थेचा अभ्यास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
Inauguration of three-day Crop Demonstration Program
Inauguration of three-day Crop Demonstration ProgramAgrowon

Nashik News : शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पन्नातील जोखीम कमी करण्यासाठी बहुपीक पद्धती महत्त्वाची आहे. त्यातूनच दरातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी फायदा होतो. त्यासाठी बाजारपेठेतील निरीक्षणे व सक्षम विक्री व्यवस्थेचा अभ्यास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

के. के. वाघ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये व सिजेंटा इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रदर्शनीय पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. त्या वेळी डॉ. रसाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ होत्या. तर कार्यक्रमासाठी ‘एनएचआरडीएफ’चे माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे, संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, ‘सिजेंटा’चे दिनेश निचत, संदीप सतपथी, रोहित पोरे आदी मान्यवरांसह शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

Inauguration of three-day Crop Demonstration Program
Peek Pahani : गहू, हरभरा पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम

डॉ. रसाळ म्हणाले, की शेतीमालाच्या उत्पादनासोबत मूल्यवर्धन व प्रक्रियेतून उत्पन्नवाढ शक्य आहे. याशिवाय पिकांचा एकरी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर फायद्याचा आहे. त्यातून विषमुक्त भाजीपाला विक्रीसाठी आणू शकतो व त्यातून अधिक परतावाही मिळू शकतो.

डॉ. रसाळ म्हणाले, की शेतीमालाच्या उत्पादनासोबत मूल्यवर्धन व प्रक्रियेतून उत्पन्नवाढ शक्य आहे. याशिवाय पिकांचा एकरी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर फायद्याचा आहे. त्यातून विषमुक्त भाजीपाला विक्रीसाठी आणू शकतो व त्यातून अधिक परतावाही मिळू शकतो.

Inauguration of three-day Crop Demonstration Program
Chana Crop : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोळेगावात हरभरा पीक प्रात्यक्षिक

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य विकास संधान, कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य हेमंत देशमुख, कृषी जैव तंत्रज्ञानचे प्राचार्य डॉ. नागेशकुमार पाचपोर, अन्न तंत्रज्ञानचे प्राचार्य प्रा. नितीन देवशेटे व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे कमलेश जाधव आदी उपस्थित होते. प्रा. तुषार उगले, प्रा. संदीप विधाते आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. विकास संधान यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना जाधव यांनी तर प्रा. तुषार उगले यांनी आभार मानले. पुरिया पार्क (म्हसरूळ) येथे बुधवारपर्यंत प्रदर्शन खुले आहे. प्रवेश निशुल्क आहे.

कमी क्षेत्रात उत्पादकता वाढीसाठी शास्त्राची जोड हवी

शेती परवडत नसल्याची सध्या ओरड आहे. अलीकडे एकरी सरासरी उत्पादकता कमी होत आहे. वातावरणातील बदल, मातीची कमी झालेली सुपीकता, अन्नद्रव्य व्यवस्थापन, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे कमी क्षेत्रात उत्पादकता वाढीसाठी शास्त्राची जोड हवीच. शेतीतला अनुभव व मिळवलेल्या कृषी ज्ञानाची जोड देऊन शेतीत प्रगती साधने शक्य आहे, असे डॉ. सतीश भोंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com