Paddy Plantation : भात साठ हजार हेक्टरवर लावणार

Kharif Season : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पूर्वमोसमीच्या सरी पडल्या आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

Pune News : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पूर्वमोसमीच्या सरी पडल्या आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने चालू वर्षी ६० हजार २०० हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने बियाणांचे वाटप सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख पाच हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.

यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठाचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्याच्या भात पट्यात सरासरीच्या ५९ हजार ९६४ हेक्टरपैकी ५८ हजार ५३७ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के भाताच्या पुर्नलागवडी झाल्या होत्या.

Paddy Farming
Paddy Sowing : मुळशीत धूळवाफेवरील भातपेरणीला सुरवात

त्याच धर्तीवर चालू वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्यात आली असून पश्चिम पट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. पश्चिम पट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे.

त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.

Paddy Farming
Paddy Farming : वाणामधील बदलाने वातावरण बदलाला उत्तर

भाताच्या विविध वाणांच्या लागवडी

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात बियाणांच्या लागवडी करण्याचे नियोजन केले आहे. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी, व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाणांच्या वाणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताची मोठ्या प्रमाणात लागवडीचे नियोजन आहे. मावळसह भोर, मुळशी तालुक्यांत पारंपरिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड करणार आहेत अशी माहिती चांदखेड येथील भात उत्पादक शेतकरी नितीन गायकवाड यांनी दिली..

दृष्टिक्षेपात...

भाताचे सरासरी क्षेत्र - ५७,९६४ हेक्टर

गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेली भात पेरणी -- ५८,५२७

यंदा भात लागवडीचे नियोजन -- ६०,२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com