Agriculture Market: खरीप हंगामातील धान मळणीच्या तोंडावर असतानाच बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्या खुल्या बाजारात नव्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसून, प्रति क्विंटल सुमारे ३०० रुपयांपर्यंत तोटा सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे..केंद्र सरकारची आधारभूत किंमत खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे..Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट.जिल्ह्यात सध्या साधारण (जाड) धानाचे दर १,८०० ते १,९०० रुपये प्रति क्विंटल, तर ‘अ’ दर्जाच्या धानाचे दर २,२०० ते २,३०० रुपये प्रति क्विंटल आहेत. मात्र नव्या धानाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे..Fodder Price Increase: कडब्याचे दर पोहोचले प्रतिटन साडेचार हजारांवर.याउलट जुन्या धानाला बाजारात २,००० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने व्यापारी जुन्या धानाकडे अधिक कल दाखवत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या चांगल्या प्रतीच्या धानालाही व्यापाऱ्यांकडून ‘मध्यम’ दर्जा देण्यात येत असल्याची तक्रार आहे.. यामुळे प्रत्यक्षात दर्जेदार धानालाही कमी भाव मिळत असून शेतकऱ्यांचे नुकसानात भर पडत आहे. त्यातूनच खरीप हंगामात मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकाला योग्य दर न मिळाल्याने नाराजी वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.