Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

Paddy Farming : जुन्नर तालुक्यात भात लागवडीच्या चारसूत्री पद्धतीत वाढ

Paddy Production : उत्पादन वाढीमुळे शेतकऱ्यांचा वाढला कल
Published on

Pune News : जुन्नर, जि. पुणे ः पारंपरिक पद्धतीने भात लागवडीतून उत्पन्न तुलनेने कमी मिळत असल्याने जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याने या पद्धतीचा अवलंब करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

तालुक्यात मागील वर्षी ८०० हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करण्यात आली होती. या वर्षी दोन हजार हेक्टरने वाढ होऊन २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. पश्चिम आदिवासी भागातील राजूर, खामगाव, उच्छिल, माणिकडोह वानेवाडी, धालेवाडी इंगळुण, सोनावळे, खडकुंबे, उसरान, उंडेखडक, केवाडी आदी गावांतून चारसूत्री भात लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे म्हणावे तसे उत्पादन मिळत नाही अशी तक्रार कायम केली जाते. त्यास पर्याय म्हणून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीवर अधिक भर दिला असल्याचे उच्छील येथील भात उत्पादक शेतकरी जयराम नवले यांनी सांगितले.

Paddy Farming
Paddy Farming : शहापूर तालुक्यात भात लावणीच्या कामाला वेग

भाताच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे. कृषी सहायकांनी गावागावात जाऊन चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे चार सूत्रीच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. पारंपरिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे अधिक फायदे होत आहेत. या पद्धतीत लागवडीसाठी कमी रोप लागते तसेच खर्चही देखील कमी येतो. मजूर कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. कृषी विभागाने याबाबत जनजागृती केली आहे. कृषी सहायकांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे, यामुळे क्षेत्रात वाढ झाली असल्याचे असे कृषी पर्यवेक्षक भारती मडके यांनी सांगितले.
या पद्धतीने लागवड केल्यास मजुरीच्या खर्चात बचत होते तसेच वेळही वाचतो, यामुळे भात लागवडीसाठी ही पद्धत चांगली आहे, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. चारसूत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात त्याचाही लाभ होतो असे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.


‘चारसूत्री पद्धतीने
लागवड केल्याने मिळाले यश’
मागील वर्षी कृषी विभागाच्या भातपीक स्पर्धेत जिल्हा पातळीवर आदिवासी गटातून निमगिरी येथील प्रशांत शेळके यांचा द्वितीय व जालिंदर साबळे यांचा तृतीय क्रमांक आला होता. तालुका पातळीवर पांडुरंग रेंगडे, खामगाव-गोद्रे, कोंडीभाऊ बांबळे, माणकेश्वर, धोंडाबाई पोटे, उच्छिल यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले होते. या सर्वांनी चारसूत्री पद्धतीने लागवड केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com