Milk Rate : दूध दराच्या मुद्द्यावरून पुन्हा किसान सभा आक्रमक, अजित नवलेंनी दिला इशारा

Farmers : दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दुध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
Milk Rate
Milk Rateagrowon

Kisan Sabha : मागच्या ६ महिन्यात राज्यात तब्बल दोन वेळा दुधाच्या खरेदी दरात घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लोकसभेच्या निवडणुका संपताच पुन्हा खाजगी दूध संस्थांनी पुन्हा दुधाचा खरेदी दर कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. दरम्यान यावर किसान सभेने जोरदार आवाज उठवला आहे. सध्या दुधाला २५ रुपयांचा दर मिळत आहे. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान किसान सभेने सरकारने तातडीने याची दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सरकारला इशारा दिला आहे.

राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला किमान ३४ रुपये दर अशी घोषणा केली होती. परंतु दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दुध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

सध्या दुधाला केवळ गाईच्या दुधाला २५ रुपये दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले. आंदोलनामुळे सुरु करण्यात आलेले दुध अनुदानही सरकारने बंद केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळं मोठा असंतोष खदखदत आहे. राज्य सरकारने या असंतोषाची तातडीने दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल असा इशारा किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

Milk Rate
Milk Rate: दूध उत्पादकांच्या निराशेचा फटका सुजय विखे पाटलांना

प्रतिलिटर किमान १० रुपये अनुदान द्यावे

दुध उत्पादकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, हे अनुदान केवळ ६ आठवडे म्हणजेच केवळ २ महिने दिले गेले. दुधाला आज मिळणारा दर पहाता हे अनुदान पुन्हा सुरु करावे, दुध उत्पादकांचा वाढता तोटा व वाढता उत्पादनखर्च पाहता अनुदानामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम प्रतिलिटर किमान १० रुपये करावी.

तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारी ते १० मार्च या काळात केवळ अनुदान दिले गेले. पुढील चार महिने अनुदान बंद आहे. बंद काळातील अनुदानासह थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावे, अशी मागणी किसान सभा वआणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com