Team Agrowon
लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. त्यातही गवतवर्गीय पिके उदा. मका, मधुमका, ज्वारी ही तिची आवडते खाद्य आहे.
तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. असा प्रादुर्भाव मधुमक्यावर जास्त दिसतो.
मादी पानांच्या वर आणि खालील बाजूस, पोंग्यामध्ये पुंजक्यांमध्ये सुमारे एक हजार अंडी घालते.
पुंजक्यामधील अंड्यांवर लोकरीसारखे आवरण असते.
पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या मका रोपावस्थेतील पाने खरवडून खातात. पानावर पांढरे लांबट चट्टे दिसतात. लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव असल्याचे समजून उपाययोजना कराव्यात.
तिसऱ्या अवस्थेतील अळी पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरुवात करते. पानांवर लहान छिद्रे दिसतात.
चौथ्या, पाचव्या, सहाव्या अवस्थेतील अळी अधाशीपणे पाने खाते. पोंग्यात मोठ्या प्रमाणात विष्ठा दिसून येते.