Agricultural Commodity Export : या शेतमालाचे निर्यातीचे निकष झाले अजून कडक

Team Agrowon

कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका

युरोपीय देशांत आयात होणाऱ्या भारतीय शेतीमालांमध्ये कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला.

Agricultural Commodity Export | Agrowon

कढीपत्ता, भुईमूग, नागवेली (खाऊ) पाने व ढोबळी मिरची

कढीपत्ता, भुईमूग, नागवेली (खाऊ) पाने व ढोबळी मिरची आदी शेतीमालांच्या तपासणीबाबत अधिकृत नियंत्रण पद्धतीत वाढ केल्याची माहिती ‘अपेडा’ने दिली आहे.

Agricultural Commodity Export | Agrowon

कढीपत्ता

शेतीमाल तपासणी प्रक्रियेसंबंधीच्या वर्गवारीत कढीपत्याचा समावेश परिशिष्ट एक (ॲनेक्शर वन) वरून दुसऱ्या परिशिष्टात करण्यात आला आहे.

Agricultural Commodity Export | Agrowon

भुईमुग

भारतीय भुईमुगात अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकाचा आढळ होऊ शकतो व त्याचा मानवी आरोग्याला धोका पोहोचू शकतो या मुद्द्याला युरोपीय महासंघाने अधिक महत्व दिले आहे. त्यादृष्टीने त्याच्या तपासण्याही ५० टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.

Agricultural Commodity Export | Agrowon

खाऊची पाने

भारतीय नागवेलीची (खाऊची) पाने ज्या युरोपीय देशात आयात होतील तेथे अधिकृत यंत्रणेमार्फंत त्यावरील नियंत्रण पातळीची संख्या वाढविली आहे. त्याचा समावेश युरोपीय कायदे नियमवलीच्या परिशिष्ट दोनवरून एकमध्ये केला आहे.

Agricultural Commodity Export | Agrowon

ढोबळी मिरची

भारतीय ढोबळी मिरचीचा समावेश सद्य:स्थितीत परिशिष्ट दोनमध्ये आहे. मात्र नमुन्यातील घटकांचा आढळ व तपासणी या प्रक्रियेची संख्या २० वरून १० टक्क्यांवर ठेवली आहे.

Agricultural Commodity Export | Agrowon

जायफळ

केवळ भुईमूगच नव्हे तर अफ्लाटॉक्सीनच्या आढळाचा धोका ओळखून भारतीय जायफळाच्या तापसण्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने जुलै २०१९ पासूनच घेतला आहे.

Agricultural Commodity Export | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...