Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

Radhakrishna Vikhe Patil : गारपीट आणि मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले असून, तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला सांगितले.
Published on

Nagar News : गारपीट आणि मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले असून, तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला सांगितले.

पालकमंत्री विखे यांनी गुरुवारी (ता. ३०) पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील एकनाथ खोदडे यांच्या नुकसान झालेल्या कांदा पिकाची, महादू बापुराव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची पाहणी केली. मॉन्सूनोत्तर पाऊस तसेच गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Paddy Crop Damage : भोर तालुक्यात पावसात नाचणी, वरईचे नुकसान

पंचनामे सुरू झाले असून, तांत्रिक कारणाने पंचनामे थांबणार नाहीत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच शासन मदत करण्याबाबत सकारात्मक असून, दोन हेक्टरची अट शिथिल करून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी

राज्यातील नुकसानीची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर मदतीबाबत निर्णय होईल. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला असून, जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करून आराखडा तयार करावा, असे सांगण्यात आले.

तसेच दूधदराबाबत सरकार विचार करत असून दूध भेसळ रोखण्यासाठी शासन कठोर कार्यवाही करीत असल्याचे ते म्हणाले.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे सुनील तुंभारे यांच्यासह यांच्यासह स्थानिक पदाधिकारीउपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com