Aslam Abdul Shanedivan
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. येथे रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे
रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान होणार असल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. तर महोत्सवाची तयारी देशभरात सुरु आहे
अयोध्येतील या ऐतिहासिक भूमिवर राम मंदिर उभारले गेले असून २२ जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
देशात मंदिर निर्मितीसह रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने आंदोत्सव साजरा केला जाणार आहे. दिवाळी साजरी केली जाईल. यावेळी एका राज्याने २२ जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे.
छत्तीसगड या राज्याने २२ जानेवारीला दिवस ड्राय डे म्हणून जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी याची घोषणा केली आहे.
रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने राज्यात २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत सुशासन सप्ताह घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री साय यांनी माहिती दिली आहे.
तसेच मुख्यमंत्री साय यांनी ड्राय डे ची घोषणा करताना, राज्य चालवण्याचा आदर्शच रामराज्य आहे. प्रभू रामचंद्रांचे आजोबा येथे छत्तीसगडमध्ये राहून गेलेत. त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो असेही त्यांनी म्हटलं आहे.