Kolhapur Godsugar Factory : कोल्हापुरच्या गोडसाखर कारखान्यांतील २९ कोटींच्या नुकसानीची सव्याज वसुलीचे आदेश

Gadhinglaj Sugar : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) आर्थिक व्यवहारातील अनियमिततेमुळे कारखान्याचे २९ कोटींचे नुकसान झाले आहे.
Kolhapur Sugar Factories
Kolhapur Sugar Factoriesagrowon
Published on
Updated on

Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory Kolhapur : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) आर्थिक व्यवहारातील अनियमिततेमुळे कारखान्याचे २९ कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची सहकारी संस्था कलम ८८ (१) नुसार सखोल चौकशी करून त्याला कारणीभूत असलेल्यांकडून सव्याज वसूल करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिले आहेत. या चौकशीसाठी सहकारी संस्थांचे द्वितीय विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

गोडसाखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या कालावधीतील आर्थिक कामकाजासंदर्भात ७ संचालकांनी तक्रार केली होती. यामध्ये सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, सभासद चंद्रकांत सावंत आणि कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह इतर सहा संचालक होते. दिलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी मावळे यांनी विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांची नेमणूक केली होती. त्यांनी तक्रारींची मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल दिला आहे. तसेच कारखान्याचे वैधानिक लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी २०२३-२४ या कालावधीतील लेखापरीक्षण पूर्ण करून वस्तुस्थितीजन्य अहवाल प्रादेशिक सहसंचालकांना सादर केला आहे.

दरम्यान, तक्रारींची मुद्देनिहाय चौकशी केल्यानंतर आक्षेपार्ह व नियमबाह्य आर्थिक कामकाज निष्पन्न झाल्याचे अहवालात म्हटले आहे. माजी अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी स्वतःच्या अधिकारात काही निर्णय घेतल्याने झालेल्या नुकसानीस त्यांना जबाबदार धरण्याचे मत फडणीस यांनी अहवालात नमूद केले आहे. त्यावरून मानक खरेदीमध्ये मोठी अनियमितता दर्शवित असल्याने त्याचा परिणाम अनधिकृत खरेदीत झाला आहे.

Kolhapur Sugar Factories
Sugar Production: गेल्या चार वर्षांनंतर साखर उत्पादनात घट! यंदा कमी उत्पादनाचा अंदाज

संबंधितांकडून नुकसानीची रक्कम वसूल होणार

योग्य पडताळणी व नियमांचे पालन न करता केलेले अनधिकृत व्यवहार हा अपहार होत असल्याचे मत मावळे यांनी आदेशात व्यक्त केला आहे. यामुळे २९ कोटींच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या व्यक्ती निश्चित करून त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम सव्याज वसूल करण्याची गरजही मावळे यांनी या आदेशातून व्यक्त केली आहे.

काय आहे आदेशात...

तक्रार अर्जातील मुद्देनिहाय सखोल चौकशी

प्रचलित व्याजदराने सव्याज आकारणी

जबाबदार पदाधिकारी, अधिकारी, संचालकांवर रक्कम निश्चित करा

तीन महिन्यात वस्तुस्थितीजन्य अहवाल द्या

अहवालात मोघमता न ठेवण्याची सक्त सूचना

जबाबदार व्यक्तीचे नाव, त्याची सव्याज रक्कम स्पष्टपणे नोंदवा

चौकशीसाठी माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे "एमडीं' 'ना आदेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com