Sugar Production: गेल्या चार वर्षांनंतर साखर उत्पादनात घट! यंदा कमी उत्पादनाचा अंदाज

Sugar Market Update: देशाच्या साखर उत्पादनात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व कर्नाटकसांरख्या मातब्बर राज्यामध्ये यंदा साखर उत्पादन कमी होत असल्याने याचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे.
Sugar
Sugar Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News: देशाच्या साखर उत्पादनात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व कर्नाटकसांरख्या मातब्बर राज्यामध्ये यंदा साखर उत्पादन कमी होत असल्याने याचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. ‘ॲग्रीमंडी’ या विश्लेषक संस्थेच्या मतानुसार, यंदा देशाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाख टन साखर कमी होऊ शकते. चार वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच ३०० लाख टनाच्या आत साखरेचे उत्पादन येण्याची शक्यता आहे.

Sugar
Sugar Factory : विघ्नहर कारखान्याने पहिली उचल ३१०० रुपये द्यावी

यंदाच्या साखर हंगामाच्या प्रारंभी ७० लाख टन साखर गेल्या वर्षीची शिल्लक होती. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीवर बंधने असल्याने साखरेचा वापर फारसा इथेनॉल निर्मितीसाठी झाला नाही. यामुळे गेल्या वर्षी ३२० लाख टन साखरेची निर्मिती झाली. २० लाख टन इतकी मर्यादित साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली गेली.

गेल्या वर्षीचे साखर उत्पादन व शिल्लक साठा मिळून ३५० लाख टन साखर देशात उपलब्ध झाली. यातील २९० लाख टन साखरेची विक्री झाली. साखर निर्मितीला पूर्णपणे बंदी असल्याने केवळ २० हजार टन साखर करारानुसार अमेरिकेसारख्या देशांना निर्यात झाली. गेल्या वर्षी साखर कारखान्यांना निर्यातीचा लाभ झाला नाही.

Sugar
Sugar Production : लातूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत १२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

यंदा देशातून दहा लाख टन साखर परदेशात निर्यात होणार असल्याने १० लाख टन साखरेची विक्री आत्ताच निश्चित झाली आहे. २०२० ला ७० लाख टन, तर २०२१ ला ११० लाख टन साखर निर्यात झाली होती. या तुलनेत यंदा साखर निर्यातीला दिलेली परवानगी अगदीच तोकडी आहे. यामुळे बहुतांश करून यंदाही साखर कारखान्यांना निर्यातीपेक्षा स्थानिक विक्रीवरच जादा अवलंबून राहावे लागेल अशी शक्यता आहे.

साखरेचे दर वाढण्याचा अंदाज

यंदा साखर निर्मितीत होणारी घट व काही प्रमाणात होणारी निर्यात यामुळे मार्चनंतर उन्हाळ्यामध्ये साखरेचे दर वाढतील असा अंदाज बाजारातील विश्लेषकांचा आहे. देशाचा साखर हंगाम आता केवळ दोन ते अडीच महिन्यांचा उरला आहे. कर्नाटकात काही कारखान्यांना ऊस कमी पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मार्चमध्ये कारखाने हळूहळू बंद होण्याची शक्यता आहे.

वर्ष साखर उत्पादन (लाख टन)

२०२०-२१ ३१०

२०२१-२२ ३५०

२०२२-२३ ३३०

२०२३-२४ ३२०

२०२४-२५ २७० (अपेक्षित)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com