Orchard Cultivation : एक हजार ७२४ हेक्टरवर फळबाग लागवड

Rojgar Hami Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील तीन हजार १२८ शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असून, या योजनेत जिल्ह्यातील एक हजार ७२४ पूर्णांक ४५ हेक्टर क्षेत्रावर या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली आहे.
Fruit Orchard
Fruit Orchard Agrowon

Rojgar Hami Yojana Nandurbar News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील तीन हजार १२८ शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असून, या योजनेत जिल्ह्यातील एक हजार ७२४ पूर्णांक ४५ हेक्टर क्षेत्रावर या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली आहे.

चालू वर्ष २०२३-२४ मध्ये दोन हजार २४० हेक्टरवर या योजनेत फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

जिल्ह्याची आढावा बैठक नुकतीच पार पडली. बैठकीनंतर पुढील वर्षाच्या नियोजनासंदर्भात बोलताना पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. ते म्हणाले, की जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीतील फलनिष्पत्ती लक्षणीय आहे.

जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ साठी दोन हजार २४० हेक्टरवर मनरेगातून फळबाग लागवड करण्यात येणार असून, त्यात नंदुरबार तालुक्यात ४८० हेक्टर, नवापूर तालुक्यात ४८० हेक्टर, अक्कलकुवात ३६० हेक्टर, शहाद्यात ४८० हेक्टर, तळोदा तालुक्यात २२० हेक्टर, अक्राणी तालुक्यात २२० हेक्टरचा समावेश आहे.

Fruit Orchard
Horticulture Plantation : 'मनरेगा'तून गाठणार ६० हजार हेक्टर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट

गेल्या २०२२-२३ या वर्षात नंदुरबार तालुक्यात १४४.८५ हेक्टरवर ४४५ शेतकऱ्यांनी, नवापूर तालुक्यात २३७.२ हेक्टरवर ६५७ शेतकऱ्यांनी, अक्कलकुवा तालुक्यात ३४२.५८ हेक्टरवर ५२७ शेतकऱ्यांनी, शहादा तालुक्यात ४२३.५ हेक्टरवर ४७३ शेतकऱ्यांनी, तळोदा तालुक्यात १६०.९० हेक्टरवर २१६ शेतकऱ्यांनी, तर अक्राणी तालुक्यात ४१६.५ हेक्टरवर ८१० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन लाभ घेतला.

एकूण एक हजार ७२७.४५ हेक्टरवर तीन हजार १२८ शेतकऱ्यांनी जिल्ह्यात लाभ घेतला आहे, अशीही माहिती पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.

या योजनेचा सर्वाधिक लाभ अक्राणी तालुक्यातील ८१० शेतकऱ्यांनी घेतला असून, त्याखालोखाल नवापूर ६५७, अक्कलकुवा ५२७, शहादा ४७३, नंदुरबार ४४५, तळोदा येथील २१६ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. चालू वर्षात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गावित यांनी केले आहे.

दृष्टिक्षेपात ‘रोहयो’मधून फळबाग लागवड

तालुका २०२२-२०२३ साध्य - लाभार्थी संख्या - क्षेत्र हेक्टर -२०२३-२४ चे उद्दिष्ट (लाखांत)

नंदुरबार - ४४५ - १४४.८५ - ४८०

नवापू- र ६५७- २३७.०२ - ४८०

अक्कलकुवा - ५२७ - ३४२.५८- ३६०

शहादा - ४७३- ४२३.०५ - ४८०

तळोदा - २१६ - १६०.९०- २२०

अक्राणी - ८१०- ४१६.०५- २२०

एकूण - ३,१२८ - १,७२४.४५- २,२४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com