
Opposition Parties Meeting : आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बंगळुरूमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर या एकजुटीच्या नावाची घोषणा केली. यावेळी इंडिया असं नाव देण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांनी या बैठकीला हजेरी लावली.
या बैठकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, महागाई किंवा संसदेत विरोधकांना बोलण्याची पूर्ण संधी न देणे या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे एकमत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, एमके स्टालिन, नीतिश कुमार, तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, जयंत चौधरी, सीताराम येचुरी, ममता बनर्जी यांच्यासह 26 पक्षांचे नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकशाही आणि देश वाचवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी नावावर सर्वांचे एकमत झाले. यूपीएचे नाव बदलून इंडिया असे करण्यात आले आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स असा आहे. आम्ही ११ जणांची समन्वय समिती बनवणार आहोत. या ११ जणांच्या बैठकीत ठरवलं जाईल की आमचा मुख्य समन्वयक कोण असेल. मुंबईत आमची बैठक होईल, तिथे याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आमचं नेतृत्व कोण करेल हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. हा तिढा लवकरच सुटेल, असे खरगे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.