Cotton Seeds : सरकार एसीमध्ये कूल, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल, पोलीस बंदोबस्तात कपाशीची विक्री

Akola District : अकोला जिल्ह्यात उन्हाच्या तिव्रता पाहून जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आला असूनही शेतकरी उन्हात उभा राहिला आहे.
Cotton Seeds
Cotton Seedsagrowon

Cotton Shortage Akola : राज्यात खरिप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये चांगल्या प्रतिचे बियाणे मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान अकोला तालुक्यात कपाशी पिकाच्या बियाण्यांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यात उन्हाच्या तिव्रता पाहून जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आला असूनही शेतकरी उन्हात उभा राहिला आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी एक्सवर आपली प्रतिक्रीया दिली ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले आहे. शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत उभं करून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण प्रश्न वर्षभराच्या जगण्याचा आहे.

बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे कारण पुढे करून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहे. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Cotton Seeds
Soybean Cotton Market : बियाणे विक्रीतील बियाण्यांचा काळाबाजार शेतकऱ्यांच्या मुळावर

सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलिस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे.

कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे.

आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाई वर अन्याय कसा झाला यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते या शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com