Counterfeit Medicine : हिवाळी अधिवशनाच्या शेवटच्या दिवशी नकली औषधावरून विरोधकांचे जोरदार आंदोलन; दावनेंचा सरकारवर आरोप

Ambadas Danve On Fake Medicine : राज्यात विविध जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात नकली आणि बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे समोर आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Ambadas Danve On Fake Medicine
Ambadas Danve On Fake MedicineAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून बनावट औषधांचे पेव फुटले असून, पुणे आणि ठाण्यातून कोट्यवधींचा औषध साठा जप्त करण्यात आला होता. यानंतर विरोधकांनी आज (ता२१) हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंसह विरोधी आमदार उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी नकली औषधे नकली सरकार अशा घोषणा देत, या प्रकरणाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय, पुण्यातील ससून हॉस्पिटल, भिवंडीसह नांदेड आणि विविध ठिकाणी बनावट औषधांची विक्री झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आता नातेवाईकही चिंता निर्माण झाली आहे. तर राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Ambadas Danve On Fake Medicine
Ambadas Danve : कापसाच्या झाल्या वाती; सोयाबीनची झाली माती

दरम्यान आज विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करताना आंदोलन केले. दानवे यांनी यावेळी, आता रूग्णांना औषध नाही तर फक्त प्रार्थांनावर अवलंबून राहावं लागेल. सध्या राज्यात नकली औषध सापडत असून राज्यातील सरकारही नकली असल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे.

राज्यात सध्या नकली औषधांचा सुळसुळाट असून रूग्णांना नकली औषधं दिली जात आहेत. राज्याच्या विविध भागात नकली औषधांचा कोट्यावधींचा साठा सापडत आहे. याला सरकार जबाबदार आहे. राज्यात सापडणारी सी ग्रेडची औषधे पूर्णपणे नकली असल्याचा दावा देखील दानवे यांनी केलाय.

Ambadas Danve On Fake Medicine
Ambadas Danve : गतवर्षीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना वाटण्याच्या अक्षता

याकडे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत असून अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. काही ठिकाणी दोषींना अटक झाली आहे. पण याला सरकारच जबाबदार असल्याचा पुनरोच्चार दानवे यांनी केला आहे.

तसेच शासकीय रूग्णालयात नकली औषधे घेऊ नये असा प्रस्ताव होता. त्याला माजी मंत्री धर्मराव आत्राम यांनी खरेदीच्या ऑर्डरला स्टे दिला होता. पण रूग्णालयात आता अधिकाऱ्यांना हाताशी धरून औषधे पुरवली जात आहेत. राज्यभर नकली औषधांचे रॅकेट पसरले आहे. तर यामुळे आत्राम यांचे मंत्रिपद गेले असावं, असाही दावा अंबादास दानवे यांनी यावेळी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com