Ambadas Danve : कापसाच्या झाल्या वाती; सोयाबीनची झाली माती

Governor Speech : राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांचे मुद्दे खोडून काढत त्या भाषणाची चांगलीच चिरफाड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. १७) केली.
Ambadas Danve
Ambadas DanveAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांचे मुद्दे खोडून काढत त्या भाषणाची चांगलीच चिरफाड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. १७) केली. राज्यपालांनी भाषणातून गुलाबी स्वप्न रंगविण्याचे काम कागदावरील भाषणातून केली आहे, अशी टीका श्री. दानवे यांनी केली.

अंबादास दानवे म्हणाले, की राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कापसाच्या केवळ वाती झाल्या असून सोयाबीनची माती उरली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रामकृष्ण उपसा सिंचन योजनेबाबत भूमिका सरकारने घेतली, परंतु यापूर्वी नियोजन व सरकारच्या असहकार्याअभावी अनेक उपसा सिंचन योजना बंद पडल्या आहेत.

Ambadas Danve
CCI Cotton Procurement : सीसीआयकडून देशात ३४ लाख कापूस गाठींची खरेदी; महाराष्ट्रातील खरेदी केवळ ५.४२ लाख गाठींवर

त्यावर देखील राज्यपालांनी लक्ष वेधणे गरजेचे होते. वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली खरी, मात्र पुढे काहीच करण्यात आले नाही. गेल्या दहा वर्षांत विदर्भ, मराठवाड्यात एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा गवगवा केला जातो, परंतु त्यातूनही विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याला काहीच आले नाही.

५.३७ दशलक्ष हेक्‍टर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले, परंतु प्रत्यक्षात २.१५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रच सिंचनाखाली आले. आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु आश्रमशाळांची तपासणी केली असता तेथे अस्वच्छतेपासून, विजेसारख्या समस्या आहेत. दुर्गम भागात नेट उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरले.

५.३७ दशलक्ष हेक्‍टर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले, परंतु प्रत्यक्षात २.१५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रच सिंचनाखाली आले. आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु आश्रमशाळांची तपासणी केली असता तेथे अस्वच्छतेपासून, विजेसारख्या समस्या आहेत. दुर्गम भागात नेट उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरले.

Ambadas Danve
Soybean Procurement : नाफेडच्या खरेदी केंद्रांवर ७७६ क्विंटल सोयाबीन खरेदी

इतकेच काय तर २०१७-२२ या कालावधीत अशा शाळांमध्ये ६८० मृत्यू झाले. श्‍वसन त्रास, विजेचा धक्‍का, पाण्यात बुडून अशी कारणे त्यामागे आहेत. दुसरीकडे मात्र टॅब देण्याच्या आपण बाता करतो आहोत. राज्याचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंना निधी देण्याबाबतही आपला हात आखडता असतो, हे दुर्देवी आहे.

सौर कृषी पंपांकरिता मुख्यमंत्री आणि कुसूम योजना आहेत. त्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी देखील भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी सिंचनासाठी वीज उपलब्धतेकरिता आजही अंधारातच चाचपडत आहे, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली.

दानवे यांच्या भाषणाचे मुद्दे...

- १२ लाख ४६ हजार ४२६ शेतकऱ्यांनी सौर पंपाकरिता नोंदणी केली आहे.

- यातील केवळ १ लाख २९ हजार ८४७ सौरपंप बसविण्यात आले.

- महावितरणचे सौर कृषी पंप बसविण्याकरिता स्वतंत्र कार्यालय, अधिकारी असावेत.

- खरीप २०२३ या वर्षातील विमा भरपाईचे २४३.९७ कोटी रुपयांचे वाटप रखडले.

- कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी ४१९४ कोटी रुपये मंजूर केले होते.

- अनुदानाचे १४०० कोटी रुपये वितरित करण्यात आले नाही.

- १३० कोटी रुपयांचे दूध अनुदान देणे बाकी आहे.

- १ एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ६७४० आत्महत्यांची नोंद झाली.

- सर्वाधिक आत्महत्या अमरावती व नागपूर जिल्ह्यांत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com