Carbon Trading : कार्बन ट्रेडिंगमधील संधी, आव्हाने...

येत्या काळात ‘कार्बन ट्रेडिंग’ हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा विषय आहे. अनेक देश आणि प्रदेश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘कार्बन ट्रेडिंग सिस्टम’ वापरत आहेत.
Carbon Trading Opportunities in India
Carbon Trading Opportunities in IndiaAgrowon

एच.जे.वाघ, डॉ.पी.सी.हळदवणेकर

भाग ः १

Carbon Trading Opportunities : कार्बन ट्रेडिंग (उत्सर्जन व्यापार) (Carbon Trading) ही एक बाजारआधारीत यंत्रणा आहे. यामध्ये कंपनी किंवा देशांना विशिष्ट प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित करण्यासाठी खरेदी आणि विक्री करण्यास परवानगी आहे.

ही प्रणाली कंपन्यांना हरितगृह वायू (greenhouse gases) उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देते. कार्बन (Carbon) क्रेडिट हे एक व्यापार करण्यायोग्य प्रमाणपत्र किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा वेगवेगळ्या हरितगृह वायूच्या समतुल्य प्रमाणात उत्सर्जित करण्याचा अधिकार दर्शविणारे प्रमाणपत्र आहे.

या प्रणालीमध्ये विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रांमध्ये उत्सर्जित होणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावर मर्यादा घालून कंपन्यांना विशिष्ट प्रमाणात कार्बन उत्सर्जित करण्याकरिता खरेदी आणि विक्रीची परवानगी दिली जाते. ज्यास ‘कार्बन अलाउन्स' म्हणतात.

या मागील कल्पना अशी आहे की, ज्या कंपन्या हरितगृह वायू उत्सर्जन त्यांच्या वाटप केलेल्या भत्यांपेक्षा कमी करण्यास सक्षम आहेत, त्यानंतर त्यांचे अतिरिक्त भत्ते अशा कंपन्यांना विकू शकतात की, ज्या असे करण्यास असमर्थ आहेत.

यामुळे कंपन्यांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन मिळते, कारण अतिरिक्त ‘कार्बन अलाउन्स' खरेदी करण्यापेक्षा असे करणे त्यांच्यासाठी किफायतशीर ठरते.

कार्बन ट्रेडिंग प्रणालीचा वापर, कार्बन ऑफसेटचा उपयोग (हे एक क्रेडिट आहे जे एखादी व्यक्ती किंवा संस्था कर्बभार कमी करण्यासाठी खरेदी करू शकते) प्रकल्पांसाठी श्रेय घेण्यासाठी देखील केला जातो, जसे की पुनर्वसन ,समुदाय, कचरा, ऊर्जा तसेच अक्षय ऊर्जा प्रकल्प, जे इतरत्र उत्सर्जन कमी करतात.

Carbon Trading Opportunities in India
Green House Gas : कार्बन क्रेडिटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हरितगृह

जागतिक परिस्थितीचा आढावा :

‘कार्बन ट्रेडिंग’ हा भविष्यात जागतिक पातळीवर वाढणारा व्यवसाय आहे. कारण अनेक देश आणि प्रदेश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन ट्रेडिंग पद्धती वापरत आहेत. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात (उदा. विद्यूत निर्मिती प्रकल्प आणि औद्योगिक कंपनी) त्या कार्बन क्रेडिट खरेदी आणि विक्री करून कार्बन ट्रेडिंगमध्ये भाग घेऊ शकतात.

हे क्रेडिट्स विशिष्ट प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करण्याच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करतात, कार्बन मार्केटमध्ये त्यांचा व्यापार केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या कंपन्या ‘कार्बन ऑफसेट’ प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत, जसे की नूतनीकरणक्षम ऊर्जा, पुनर्वनीकरण प्रकल्प.

हे प्रकल्प कार्बन क्रेडिट तयार करू शकतात आणि ते कार्बन मार्केटमध्ये विकता येते. त्याशिवाय बँका, दलाल आणि एक्स्चेंजेस सारख्या वित्तीय संस्था आणि मध्यस्थ देखील ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, जोखीम व्यवस्थापन सेवा आणि गुंतवणुकीच्या संधी देतात.

सर्वसाधारणपणे, अशी अपेक्षा आहे की, जास्तीत जास्त देश आणि प्रदेश उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करतील, कार्बन किंमत यंत्रणा लागू करून कार्बन ट्रेडिंग मार्केट वाढीस चालना देतील.

प्रमुख देश/प्रदेशांतील कार्बन किमतीच्या उपक्रमाद्वारे समाविष्ट केलेल्या वार्षिक जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा वाटा (एप्रिल २०२२ च्या स्थितीनुसार)

१) जागतिक बँकेकडील माहितीनुसार, जगामध्ये सन २०२२ पर्यंत ७० कार्बन मूल्य निर्धारण उपक्रम निवडले आहेत. ४७ राष्ट्रीय अधिकार क्षेत्र आणि ३६ उपराष्ट्रीय अधिकार क्षेत्र निवडलेल्या उपक्रमांमध्ये समाविष्ट आहेत.

या उपक्रमांमध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या २३.१७ टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या ११.८६ गिगा टन कार्बन डॉयऑक्साईड समतूल्य आहे.

२) जगामध्ये सन २०२१ पर्यंत २७ कार्बन क्रेडिटींग यंत्रणा अमलात आली. तसेच ५ कार्बन क्रेडिटींग यंत्रणा विकसित झाल्या आहेत.

यामध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय यंत्रणांचा समावेश आहे, त्यांनी कार्बन क्रेडिट लागू करून त्यांचा वापर अनिवार्य कार्बन किंमत उपक्रमांतर्गत केला आहे.

Carbon Trading Opportunities in India
Carbon Emissions : व्यापार कार्बन क्रेडिटचा!

जागतिक कार्बन व्यापारात आघाडीवर असलेले देश आणि स्थापित प्रणाली :

१) क्योटो प्रोटोकॉल हा संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘इंटर गव्हर्नमेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज'द्वारे (आयपीसीसी) १९९७ मध्ये प्रस्तावित केलेला सार्वत्रिक करार आहे. या करारामध्ये देशांतर्गत हरितगृह वायू उत्सर्जन, विशेषत: कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी ‘कार्बन क्रेडिट्स’ कसे वापरावेत, याची रूपरेषा स्पष्ट केली आहे.

२) कार्बन क्रेडिट्स ही हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी एक यंत्रणा आहे. जगभरातील अनेक देश आणि प्रदेशांना ही प्रणाली स्थापन केली आहे. यामध्ये ‘युरोपियन युनियन इमिशन्स ट्रेडिंग सिस्टीम' ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात सुस्थापित कार्बन ट्रेडिंग पद्धती आहे.

यामध्ये ३० देशांमधील ११,००० हून अधिक वीज केंद्र आणि औद्योगिक संयंत्रे समाविष्ट आहेत.

३) युरोपियन युनियन कार्बन क्रेडिटची किंमत गेल्या वर्षामध्ये कार्बन डाय ऑक्साईड प्रति टन सुमारे ५९ युरो ते ९८ युरोच्या दरम्यान आहे.

४) ‘रिजनल ग्रीनहाऊस गॅस इनिशिएटिव्ह' हा अमेरिकेतील नऊ ईशान्य आणि मध्य- अटलांटिक राज्यांमधील ऊर्जा क्षेत्रातून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठीचा एक सहकारी प्रयत्न आहे.

शिकागो क्लायमेट एक्स्चेंज हे अमेरिकेतील एक ऐच्छिक कार्बन ट्रेडिंग मार्केट होते. तेथे गेल्या दशकात कार्बन ऑफसेट क्रेडिट्सचा वापर १ ते ७ अमेरिकी डॉलर प्रति टन कार्बन डायऑक्साईडच्या दरामध्ये झाला.

५) ‘वेस्टर्न क्लायमेट इनिशिएटिव्ह' ही अमेरिकेतील विविध राज्ये आणि कॅनेडियन प्रांतांची भागीदारी आहे. जी हरितगृह वायू उर्त्सजन कमी करण्यासाठी प्रादेशिक कार्यक्रम विकसित करण्यासाठी एकत्र काम करते.

६) कार्बनची किंमत ही उपलब्ध असलेल्या सर्वात मजबूत हवामान धोरणापैकी एक मानली जाते. जी जागतिक अर्थव्यवस्थेच्या डिकार्बनायझेशनमध्ये (कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन शाश्‍वतपणे कमी करणे आणि नुकसान भरपाई देणाऱ्या आर्थिक व्यवस्थेत रूपांतरण करणे) महत्त्वाची जबाबदारी बजावणार आहे.

संपर्क ः एच.जे.वाघ, ९४०४४०२९८५ (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, जि.सिंधुदुर्ग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com