Banana : ... तरच केळीला येतील `अच्छे दिन’

कृषी विद्यापीठे किंवा अॅग्रेस्कोच्या उपक्रमातून शेतकऱ्यांना केळीमध्ये खत, पाणी याचे योग्य नियोजन, पिकांच्या पान, देठ यांची चाचणी, हवामान अंदाज, नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान मिळायला हवे.
Banana
BananaAgrowon

जळगाव हे केळीचे (Banana Hub) आगार आहेच. पण राज्यातील बहुतेक सर्व भागात आता केळीचे उत्पादन (Banana production) घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षांत पाण्याचा चांगला स्रोत असणाऱ्या भागात केळीचा (Keli) विचार हमखास होतो आहे.

पण या सगळ्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक म्हणून कृषी विद्यापीठाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यावर विद्यापीठाने काम करण्याची वा हा विषय केंद्रीभूत ठेवून काम वाढवण्याची गरज आहे.

केळीची रोगमुक्त रोपे (Banana plant) मिळावीत, जी-नाईन हे वाण त्यातही उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता या वातावरणाला प्रतिकार करू शकेल, असे नवीन वाण संशोधित करावे.

कृषी विद्यापीठाने यापूर्वीही केळीसंबंधी अनेक प्रकारचे संशोधन केले आहे, ते नाकारता येणार नाही. पण हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोचले आणि वेळेत पोचले का, हा प्रश्न आहे.

आता माहितीचे माध्यम बदलले आहे. त्या बदलाचा विचार करून कृषी विद्यापीठाने केळीच नव्हे तर अन्य पिकांचे संशोधनही किसान अॅप किंवा मोबाईलसारख्या डिजिटल माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

कृषी विद्यापीठे किंवा अॅग्रेस्कोच्या उपक्रमातून शेतकऱ्यांना केळीमध्ये खत, पाणी याचे योग्य नियोजन, पिकांच्या पान, देठ यांची चाचणी, हवामान अंदाज, नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान मिळायला हवे.

त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजिली पाहिजेत, कुशल कामगार प्रशिक्षण केंद्र, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी अभ्यासदौरेही आयोजिले पाहिजेत, तरच त्यांच्या ज्ञानाची, माहितीची चांगली देवाण-घेवाण होईल.

पूर्वीसारखी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता गेले आहेत, त्यातही केळीसारख्या पिकात तर हे शक्यच नाही.

Banana
Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

विशिष्ट तंत्राने शेती करण्याचे दिवस आहेत. त्यात हवामान बदलाचा मोठा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो आहे. केळी शेतीतला एकूण खर्च आणि मिळणारे उत्पन्न याची फक्त सध्या तोंडमिळवणी होतेय.

एखादे वर्ष वाढीव दरामुळे हातात काही तरी पडते, पण सरसकट दरवर्षी तीच परिस्थिती राहील, हे सांगता येत नाही. केळीमध्ये मार्केटचा प्रश्न बऱ्यापैकी सुटतो, पण उत्पादनातील तांत्रिक अडचणी आहेत.

त्या सोडवता आल्या पाहिजेत, ही जबाबदारी सरकारची अर्थात कृषी विद्यापीठाची आहे. ती त्यांनी घ्यावी, तरच केळीला चांगले दिवस येतील.

किरण डोके, उद्यानपंडित, प्रगतिशील केळी उत्पादक कंदर, ता. करमाळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com