Sugarcane Season : गाळप परवान्यासाठी केवळ चार कारखाने पात्र

Sugarcane Crushing : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात गाळप हंगाम २०२४-२५ करिता चार जिल्ह्यातील २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात गाळप हंगाम २०२४-२५ करिता चार जिल्ह्यातील २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यात २० खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यापैकी केवळ चार कारखान्यांनी ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची थकीत रक्कम भरल्यामुळे त्यांचे अर्ज गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तालयाकडे पाठविल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी सकाळ ‘ऍग्रोवन’शी बोलताना दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातून गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी चार जिल्ह्यातून २९ ऑनलाइन अर्ज आले आहेत. यात २० खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश आहे. यापूर्वी अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून राज्याच्या साखर आयुक्तांकडे परवान्यासाठी अर्ज पाठविण्यात येत असतो.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : मतांसाठी साखर हंगाम ढकलला लांबणीवर

परंतु यंदा साखर आयुक्तांनी ज्या कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची प्रतिटन निर्धारित केलेले रक्कम भरलेल्या कारखान्यांचा अर्ज पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नांदेड विभागातील योगेश्‍वर शुगर इंडस्ट्रीज लि. लिंबा, जी-७ शुगर लि. माखणी, कपीश्‍वर शुगर अँड केमिकल लि. जवळा बाजार व विलास सहकारी साखर कारखाना तोंडार, या चार कारखान्यांनी ही अट पूर्ण केल्यामुळे त्यांचे अर्ज साखर आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत.

तर अर्ज दाखल केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातून एक सहकारी तर पाच खासगी कारखान्याचा समावेश आहे. तर हिंगोली जिल्ह्यातून दोन सहकारी व तीन खासगी, परभणी सात खासगी आणि लातूर जिल्ह्यातून पाच सहकारी व सहा खासगी अशा ११ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज सादर केल्याची माहिती सचिन रावल यांनी दिली.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : लातूर, धाराशिवमध्ये यंदा उसाचे क्षेत्र वाढणार

गाळपासाठी ऑनलाइन अर्ज केलेले कारखाने

नांदेड ः भाऊराव चव्हाण साखर कारखाना, देगाव (सहकारी), एमव्हीके ग्रो फुड लि., सुभाष शुगर, हडसणी, कुंटूरकर शुगर्स, कुंटूर, शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर लि. मुखेड व व्यंकटेश्वरा शुगर लि. शिवणी (सर्व खासगी).

हिंगोली ः भाऊराव चव्हाण साखर कारखाना, पूर्णा सहकारी साखर कारखाना, पूर्णा सहकारी साखर कारखाना , टोकाइ सहकारी साखर कारखाना, (सर्व सहकारी), शिऊर साखर कारखाना लि. (खासगी).

परभणी ः गंगाखेड शुगर एनर्जी लि. माखणी, बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वारी शुगर लि. लिंबा, रेणुका शुगर लि. पाथरी, त्रिधारा शुगर लि. अमडापूर. (सर्व खासगी).

लातूर ः विकास सहकारी साखर कारखाना लि. लातूर, विकास सहकारी साखर कारखाना तोंडार, मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीपनगर (सर्व सहकारी), जागृती शुगर न्ड अलाइड लि. तळेगाव, सिद्धी शुगर न्ड अलाइड इंडस्ट्रीज, श्री साइबाबा शुगर, पन्नगेश्वर शुगर लि. पानगाव व व्टेंटीवन शुगर्स.

नांदेड विभागातून गाळप हंगाम २०२४-२५ साठी चार जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यात २० खासगी तर नऊ सहकारी साखर करण्याचा समावेश आहे. यापैकी केवळ चार कारखान्यांचे अर्ज परवान्यासाठी साखर आयुक्तांकडे पाठविले आहेत.
- सचिन रावल, प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com