Fodder Shortage : महिना-दोन महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

Animal Fodder Shortage Issue : नोव्‍हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ११ लाख ८० हजार ३५८ टन इतका चारा उपलब्ध होता. अर्थात हा चारा एक ते दोन महिनेच पुरेल इतका असल्याने सध्या काही प्रमाणात चाराटंचाई निर्माण होऊ लागली आहे.
Animal Fodder
Animal FodderAgrowon
Published on
Updated on

Sangli News : यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बीचा हंगाम कसा पार पाडायचा याची चिंता आहे. मात्र, नोव्‍हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ११ लाख ८० हजार ३५८ टन इतका चारा उपलब्ध होता. अर्थात हा चारा एक ते दोन महिनेच पुरेल इतका असल्याने सध्या काही प्रमाणात चाराटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ लाख ३ हजार ६०० जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जत तालुक्यात सर्वाधिक जनावरांची संख्या आहे. मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो, तर छोट्या जनावरांना ६ किलो चाऱ्याची गरज असते.

त्यामुळे जिल्हा पशुसंर्वधन विभागाने नोव्हेंबर महिन्यात प्रति दिन लहान व मोठ्या जनावरांना किती चारा लागतो आणि चाऱ्याची उपलब्धता आहे. याची माहिती संकलित केली. त्यानुसार जिल्ह्यात दररोज जनावरांना २५ हजार २६५ टन इतका चारा लागतो. जिल्ह्यात दररोज जनावरांना १६ हजार ६६८ टन चारा लागतो. सध्या जिल्ह्यात ११ लाख ८० हजार ३५८ टन चारा उपलब्ध आहे.

Animal Fodder
Animal Fodder Shortage : पावसामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी चाराटंचाई

यंदा पावसाने ओढ दिल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच खरीप हंगाम वाया गेल्याने ज्वारीचा कडबा हाती पडला नाही. त्यातच मका पीक पाण्याअभावी वाळून गेले असल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीचा वाळला चारा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यात १०२ दिवस, तर मिरज तालुक्यात ९६ दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे.

तर इतर तालुक्यात महिना ते दीड महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून चारा विकत घेण्याची वेळ आली असली तरी, चारा विकत घेण्यासाठी जवळपास चाराच नसल्याने जनावरे कशी जगवायची असा प्रश्न पशुपालकांच्या समोर पडला आहे.

Animal Fodder
Animal Fodder : हिरवा, वाळला कसाही वापरा ओट चा चारा

चारा लागवडीसाठी मोफत बियाणे

प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे. आतापर्यंत ३० लाखांचे बियाणे दिले. आणखी ७० लाख रुपयांची तरतूद आहे. पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करून २० हजार ५०० टन चारा उपलब्ध होईल.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे एक महिनाभर पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्यातरी चाराटंचाई कुठेच नाही. परंतु चाराटंचाई लक्षात घेऊन चारा लागवडीसाठी नियोजन आराखडा तयार केला आहे.
डॉ. अजयनाथ थोरे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन सांगली

जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांची संख्या व उपलब्ध प्रतिदिन लागणारा चारा दृष्टिक्षेप

तालुका पशुधन संख्या उपलब्ध चारा (टनात) दिवस

आटपाडी १,४९,८१७ ८२,७८८ ५४

जत ३,५४,७६५ २,८८,९५५ ७७

तासगाव १,२५,३५३ ५८,६४२ ३७

खानापूर ९६,५३२ ८२,१९९ ७१

कवठेमहांकाळ १,४०,९९२ ८०,६२९ ५०

कडेगाव ८१,०९८ १,०४,१८५ १०२

मिरज १,४३,८९३ १,७६,२७७ ९६

पलूस ७३,९३१ ६९,११८ ७१

शिराळा ८१,१३५ ६०,२६९ ५२

वाळवा १,६५,११७ १,७७,२९७ ८५

एकूण १४,०३,६३३ ११,८०,३५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com