Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

Healthy Grains : हवामान बदलाच्या काळात भरडधान्यांचे महत्त्व वाढले आहे. विविध जैविक- अजैविक घटकांना प्रतिकार करण्याचे गुणधर्म त्यांच्यात आहेत. शिवाय अन्न- पोषण सुरक्षा देण्याबरोबर मूल्यवर्धन- प्रक्रियेतून भरडधान्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारीही ठरत आहेत.
Millet
MilletAgrowon

गोपाल हागे

Truth about Grains : सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्ये (मिलेट्‌स, लघू पौष्टिक धान्ये) वर्ष म्हणून जगभर साजरे झाले. त्या निमित्ताने या धान्यांचा प्राचीन ठेवा, आरोग्यदायी महत्त्व प्रकाशात आले. विविध भागांतील शेतकरी व आदिवासींनी त्याचे वाण जतन केले आहेत. आजवर दुर्लक्षित राहिलेली अनेक भरडधान्ये कोरोना काळानंतर आज आहाराचा नियमित भाग झाली आहेत.

भरडधान्यांचे महत्त्व

कमी कालावधी, कमी देखभाल व खर्चात शाश्‍वत उत्पादन.

अन्न, पोषणसुरक्षेसह पशुचारा व शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची क्षमता.

ग्लुटेन मुक्त, कमी ग्लायसेमिक इंडेक्स, तंतुमय, प्रथिनांनी समृद्ध.

दुष्काळ,, थंडी, किडी-रोग आदी प्रतिकूल परिस्‍थितीत प्रतिकारक वा तग धरून राहण्याची क्षमता.

नाचणी पूर्वी खरिपात व्हायची. आता उन्हाळी लागवड यशस्वी होत आहे.

बर्टी, वरई खरिपासह रब्बीत चांगले उत्पादन देऊ शकतात.

यांत्रिकीकरण, मूल्यवर्धनाची जोड मिळाल्यास या पिकांना आघाडी घेणे शक्य.

Millet
Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

भरडधान्यांचे प्रयोग

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील कृषी संशोधन केंद्रात राळा, वरई, नाचणी, भगर, बर्टी, कोदो आदी भरडधान्यांवर संशोधन सुरू आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचे मार्गदर्शन त्यासाठी लाभले आहे. येथील शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे यांनी मेळघाट, कळवण, इगतपुरी, अकोले, नंदुरबार, मध्य प्रदेशातील बैतुल आदी आदिवासी भागांत दौरे केले.

त्यातून पारंपरिक वाणांचे संकलन केले. त्या आधारे निवड पद्धतीने बदलत्या वातावरणात तग धरणारे, कमी कालावधीत तयार होणारे वाण विकसित करण्यास सुरुवात केली. त्यातूनच राज्यातील राळ्याचा (भादली) पीडीकेव्ही यशश्री हा पहिला वाण विकसित झाला.

पीडीकेव्ही ‘यशश्री’ वाणाची वैशिष्ट्ये

खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामांतही येणारे वाण

हेक्टरी २३ क्विंटल उत्पादन क्षमता.

८५ ते ९० दिवसांत काढणीस तयार.

किडी-रोगांविरुद्ध तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता

पौष्टिक गुणधर्मांनी युक्त.

बुलडाणा केंद्रात संकलित ‘जर्मप्लाझम’ (जननद्रव्ये)

नाचणी ३३०

वरई ६२

बर्टी ६४

राळा १००

कोदो १०

Millet
Food Grain Pest : साठवणुकीत धान्याला कीड लागण्याची कारणे

शेतकरी कंपनीकडून विक्री

अकोला येथील ‘सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनी’ बाजरी, नाचणी, भादली, भगर, वरी, कोदो, सावा आदी भरडधान्यांची विक्री करते. मागील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने पाच लाखांपासून ते मागील वर्षापर्यंत १४ लाखांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. भरडधान्ये वर्ष (२०२३) जाहीर झाल्यानंतर विविध माध्यमांतून प्रसिद्धी व जागरूकता झाल्याने मागणी वाढल्याचे कंपनीचे अध्यक्ष रूपेश पाटील- लडे यांनी सांगितले.

कंपनी आदिवासींकडून धान्यांची खरेदी करते. कुटकी मेळघाटातील धारणी तालुक्यातून, कोदो चिखलदरा तालुका, भगर नंदुरबार- तळोदा, नाचणी जव्हार, तलासरी या भागांतून, तर बाजरी विदर्भातील स्थानिक शेतकऱ्यांकडून उपलब्ध होते.

यंदा कंपनीने कातखेड (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथे रब्बीत नऊ भरडधान्यांची लागवड केली. विदर्भातील वातावरणात त्यांपासून चांगले उत्पादन मिळू शकते असे आढळले आहे. आगामी खरिपात १० एकरांत लागवडीचा मानस आहे.

यंदा रब्बीत प्रथमच कपाशी काढणीनंतर ‘यशश्री’ राळा वाणाचा (दोन किलो बियाणे) प्रयोग केला. ठिबकद्वारे आठवड्यातून दोन वेळा दोन-दोन तासांच्या पाळ्यांमध्ये सिंचन केले. पाणी, खते, कीडनाशके यांचा अत्यल्प वापर करून उत्तम पीक तयार होत आहे.
ओंकार गोडबोले ९८२२५८८५२१, गुळभेली, जि. बुलडाणा
बारा एकर शेतीपैकी नऊ एकरांत फळबाग आहे. लघुधान्ये सावलीतही येऊ शकतात हे माहीत असल्याने डॉ. कानवडे यांच्या सल्ल्यानुसार सीताफळात विद्यापीठाचे राळा वाण घेतले. गरजेएवढेच पाणी, युरिया व ‘एसएसपी’ यांचा वापर केला. कीडनाशक फवारणीची गरज पडली नाही. वातावरण बदलात हे पीक फायदेशीर ठरू शकते असा विश्‍वास आहे.
श्याम मराठे ९४२२१६०९९०, सोनाळा, ता. मालेगाव, जि. वाशीम
यंदा एक एकरात जानेवारीत राळा घेतला. पिकाची अवस्था उत्तम असून, उन्हाळ्यात हा चांगला पर्याय होऊ शकतो असे वाटते. बाजारात राळयाला मागणी चांगली असून, उत्पादन खर्च कमी आहे.
विलास गायकवाड ८३२९२८६५५०, अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी, बाळखेड, जि. वाशीम

भरडधान्यांपासून उत्पादने

जहागीरदारवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बाळू किसन घोडे म्हणाले की नाचणी, वरई, राळा, भादली अशी एकूण चार एकरांत लागवड करतो. आमचे गाव प्रसिद्ध कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असल्याने वर्षभर पर्यटक येत असतात. त्यांच्या आहारात ‘मिलेट्‍स’चा वापर वाढावा असे प्रयत्न आहेत.

‘फॅमिली डॉक्टर’ प्रमाणे प्रत्येक कुटुंबासाठी ‘फॅमिली फार्मर’ असावा या संकल्पनेला पुढे नेत आहे. नाचणी, वरईवर प्रक्रिया करतो. नाचणीची इडली, डोसा यांसह भगर तयार करून विक्री करतो. ‘मिलेट्‍स’ची बियाणे बँक उभारली आहे. त्यास ‘बायफ’ संस्थेचे पाठबळ मिळाले आहे.- बाळू घोडे ९६५७१९०४१९

सतीश खाडे ९८२३०३०२१८

(लेखक पुणे स्थित असून, जल व्यवस्थापन, जलप्रदूषण व कृषी- पर्यावरण विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com