E-Peek Pahani : आजपासून ई-पीक पाहणीसाठी विशेष मोहीम

Crop Registration : यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामात गुरुवारी (ता. १९) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार ३६० शेतकरी खातेदारांनी ४ लाख ३६ लाख ६६२ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामात गुरुवारी (ता. १९) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार ३६० शेतकरी खातेदारांनी ४ लाख ३६ लाख ६६२ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली आहे.

उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पेरा नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात शनिवार (ता. २१) ते सोमवार (ता. २३) पर्यंत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत १ लाख ६९ हजारांवर शेतकरी खातेदाराच्या ई-पीक पेरा नोंदणीचे उद्दिष्ट असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

यापूर्वी ई-पीकपाहणी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशानुसार गुरुवारी (ता. १२) व शुक्रवारी (ता. १३) विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर ई-पीकपाहणी क्षेत्रात मोठी वाढ झाली.

जिल्ह्यात यंदा खरिपाची ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टर पेरणी झाली आहे. गुरुवार (ता. १९) पर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार ३६० शेतकरी खातेदारांनी ४ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली. अजून पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यामध्ये ९१ हजार २३९ हेक्टरचा फरक आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : हत्तूरमध्ये होईना ई-पीक पाहणी नोंदणी

जिल्ह्यातील ५ लाख ७२ हजा ३५९ पैकी २ लाख २८ हजारांवर शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी बाकी आहे. जिल्ह्यातील ८४८ गावांतील शेती खात्यांचे क्षेत्र ६ हजार ७ हजार ५६९ हेक्टर आहे. सर्व गावांमध्ये ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती करण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व खातेदारांना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वतः गाव नं ७-१२ वर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

विशेष मोहिमेत प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी नोंदणी केल्यास एकूण १ लाख ६९ हजार ६०० एवढ्या शेतकरी खातेदारांची ई-पीकपेरा नोंदणी पूर्ण होईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी याबाबतचे सूक्ष्म नियोजन करून ही विशेष मोहीम राबवावी.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तलाठी,कृषी सहायक,पोलिस पाटील,रोजगारसेवक,रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महावि‌द्यालयातील विद्यार्थी (असल्यास) तसेच तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकांची निवड करुन त्यांच्या साहाय्याने शेतकऱ्यांकडून ई-पीकपाहणी अॅपद्वारे पेरा नोंदणी पूर्ण करुन घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com