Kharif Crop Loan : खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ५५ टक्केच पीककर्ज वाटप

Agriculture Loan : जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ५५ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०५ टक्के, तर ग्रामीण बँकने ९९ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ५५ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०५ टक्के, तर ग्रामीण बँकने ९९ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी १८२५.७३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात ७६ टक्क्यांनुसार १३९४.१४ कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती बँकेच्या सूत्राने दिली.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी १८२५.७३ कोटी, तर रब्बीसाठी ६८५.२३ कोटी असे एकूण दोन हजार ५१०.९६ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत. पीककर्ज वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी सर्वच बँकर्सना वेळोवेळी सूचना दिल्या. परंतु राष्ट्रीयीकृत बँकांनी मात्र कर्जवाटपात हात आखडता घेतला.

Crop Loan
Rabi Crop Loan : रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाची ओरड

राष्ट्रीयीकृत बँकांनी ५४.७४ ३९ टक्क्यांनुसार ४५ हजार ८२८ खातेदारांना ५५३.६३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १०५ टक्क्यांनुसार ५४ हजार ३७० खातेदारांना ४४०.३२ कोटी, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९९ टक्क्यांनुसार ४६ हजार ४७५ खातेदारांना ४१० कोटी १९ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात ७६.३६ टक्क्यांनुसार खरिपासाठी एकूण एक लाख ४६ हजार ६७३ खातेदार शेतकऱ्यांना १३९४.१४ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाकडून मिळाली.

रब्बीत पीककर्ज वाटपाला गती नाही

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्यात रब्बीसाठी ६८५.२३ कोटी पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. यानुसार रब्बी हंगामासाठी (ता. १) ऑक्टोबरपासून पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या. परंतु आजपर्यंत जिल्ह्यात नऊ टक्क्यांनुसार सहा हजार १९ शेतकऱ्यांना ६५ कोटी सहा लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामुळे कर्ज वाटपाला गती नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com