Ratnagiri Shil Dam : अथांग समुद्र असलेल्या रत्नागिरीतील शिळ धरणात फक्त २५ टक्केच पाणीसाठा

Shil Dam Ratnagiri : शिळ धरणात आता २५ टक्केच साठा शिल्लक आहे. सध्या जैसे थे परिस्थिती असली तरी १५ जूनपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता आहे.
Ratnagiri Shil Dam
Ratnagiri Shil Damagrowon

Water Storage Ratnagiri : राज्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती बनली आहे. तर काही जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपासून टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. तर अनेक धरणातील पाणीसाठी कमी होत चालला आहे. रत्नागिरी शहरातही अशीच स्थिती बनत चालली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा उपयुक्त पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

पाणीटंचाई आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने पालिकेचे नियोजन सुरू आहे.

रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत. शीळ, पानवल धरण आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवले आहे, तर नाचणेतील तलाव आटल्यामुळे एका शीळ धरणावर शहराची भिस्त आहे.

गेल्या वर्षी या महिन्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू होता. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा एलनिनोमुळे परतीचा पाऊसच झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण २० ते २५ दिवस भरून वाहते. त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणीपुरवठा होतो.

शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७७६ दशलक्ष घनमीटर आहे; परंतु या वेळी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीपासूनच धरणातील साठा मर्यादित झाला. सध्या या धरणामध्ये ०.८१९ दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे. धरणात २५ टक्केच पाणी आहे. हे पाणी १५ जूनपर्यंत पुरेल, अशी अपेक्षा आहे.

टंचाईचे संकट गडद

शहरात साडेअकरा हजार नळधारक असून, त्यांना दिवसाला २० एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो. धरणात आता २५ टक्केच साठा शिल्लक आहे. सध्या जैसे थे परिस्थिती असली तरी १५ जूनपर्यंत पाणी पुरावे यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com