Dam Water Storage : धरणांतील पाणीसाठा २४ टक्क्यांवर

Water Stock In Dam : गेल्या दोन महिन्यांत तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर झपाट्याने घट झाल्याचे पाहायला मिळाले.
Water Shortage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Nashik News : गेल्या दोन महिन्यांत तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर झपाट्याने घट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पाण्याची गरज वाढल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तने सोडण्यात आली.

त्यामुळे उपलब्ध पाण्याची टक्केवारी कमी झाली. सध्या जिल्ह्यातील एकूण २४ धरण प्रकल्पांत बुधवारअखेर (ता. ११) एकूण २४.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जो मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे, असे असले तरी पाण्याचे काटेकोर नियोजन करून वापर करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील ७ मोठ्या व मध्यम १७ धरण प्रकल्पांचा एकूण संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ६५ हजार ६६४ दलघफू आहे. त्यापैकी सध्या १६ हजार १३८ दलघफू पाणीसाठा (२४.५८ टक्के) उपलब्ध आहे. मागील वर्षी ५ हजार ३७३ दलघफू पाणीसाठा(८.१८ टक्के) होता. पाऊस सुरू होण्याच्या दिवशी ५ मे रोजी जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा ३१.२७ टक्के होता. तो पुढील एक महिन्यात ६.६९ टक्क्यांनी कमी झाला आहे.

Water Shortage
Sangli Water Storage : सांगली जिल्ह्यातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर

एप्रिलमध्ये उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. तर मे च्या पहिल्या सप्ताहापर्यंत उन्हाळा असह्य होता. मात्र ५ मे पासून तर आतापर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी जिल्ह्यात कायम आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असल्याने चटका कमी झाला आहे. त्यामुळे भूपृष्टीय जलसाठ्यातील बाष्पीभवन तुलनेत कमी झाले आहे.

Water Shortage
Satara Water Storage : सातारा जिल्ह्यातील धरणांत ४०.८३ टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्यात बहुतांश धरणातील पाणीसाठा २० ते ४४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे मॉन्सूनपर्यंत उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गंगापूर धरण समूहात सध्या १५ टक्के अधिक पाणीसाठा आहे. प

ालखेड, दारणा धरण समूहात यंदा अधिक आहे. तर गिरणा धरण समूहात ५ हजार ०२९ दलघफू साठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. तर पुणेगाव, भोजापूर व माणिकपुंज धरण कोरडे झाले आहे. तिसगाव, नाग्यासाक्या धरणात अवघा २ टक्के साठा शिल्लक आहे.

धरणांची स्थिती अशी

जिल्ह्यात २४ धरण प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा शिल्लक

गिरणा धरणात सर्वाधिक ३,९३६ दलघफू पाणीसाठा शिल्लक

माणिकपुंज, पुणेगाव व भोजपूर धरण कोरडे

वाघाड, तिसगाव, नाग्यासाक्या धरणांनी गाठला तळ

धरणांचा पाणीसाठा (दलघफू)

धरण पाणीसाठा

गंगापूर २,५०१

काश्‍यपी ५२९

गौतमी-गोदावरी १६६

आळंदी ९२

पालखेड २८२

करंजवण ५९५

वाघाड ८१

ओझरखेड ४८९

पुणेगाव ०

तिसगाव ११

दारणा २,५४२

भावली २६८

मुकणे २,४६३

वालदेवी २३४

कडवा २६५

भोजापूर २

चणकापूर ५९०

हरणबारी ३२१

केळझर १७२

नागासाक्या १०

गिरणा ३,९३६

पुनद ३३२

माणिकपुंज ०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com