Landscape Designing : ‘लॅन्डस्केप डिझाईनिंग’बाबत ऑनलाइन करिअर अभ्यासक्रम

Landscape Course : या अनोख्या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरी करणारा वर्ग डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे.
Landscape Designing
Landscape Designing Agrowon

Pune News : येथील नामांकित शासकीय संस्था ‘एआयएसएसएमएस (ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी)’ आणि सकाळ माध्यम समूह व ‘ॲग्रोवन’संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ यांच्यात ‘लॅन्डस्केप डिझाईनिंग’ हा संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विशेष शैक्षणिक करार करण्यात आला.

विमानतळ, शहरातील रस्ते, चौक, व्यावसायिक ठिकाणे, हॉटेल्स, उद्याने, रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा परिसर इथपासून ते घराचा एखादा छोटासा कोपरा जिवंतपणे सुशोभित करण्यासाठी ‘लॅन्डस्केप प्लॅनिंग व डिझाईनिंग या विषयातील कौशल्य आत्मसात करून त्यात करिअर करण्याला भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर हा करार झाला.

Landscape Designing
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीला हवी जैविक घटकांची जोड

‘एआयएसएसएमएस’च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राचार्य डॉ. पी. बी माने आणि ‘एसआयआयएलएसी’चे सहसरव्यस्थापक अमोल बिरारी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी ‘एसआयआयएलसी’च्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. मंजूषा मोरे, वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे तसेच ‘एआयएसएसएमएस’चे कार्यालय अधीक्षक ए. जे. मते, सहायक प्राध्यापक गायत्री मावळे, महेश निगडे, डॉ, प्रीतम शहा, अमित रहेजा, आशिष आपटे हे उपस्थित होते.

Landscape Designing
Agriculture Scam : जतमध्ये अवकाळीच्या पंचनाम्यांत गोलमाल

या अनोख्या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरी करणारा वर्ग डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रोजेक्टला फिल्ड व्हिजिटचे आयोजन असेल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाईल. सविस्तर माहितीसाठी स्वप्नील साखरे (संपर्क:८७८८८३०१४१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

अभ्यासक्रमाचे विषय

- झाडे, झुडुपे, वेलींचा लॅन्डस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर

- मियावाकी प्लांटेशन पद्धतीचे महत्त्व

- रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लॅन्डस्केपचे नियोजन

- लॅन्डस्केपसाठी बांधकाम रचना, नियोजन

- साइट प्लॅनिंग व लॅन्डस्केप प्रोजेक्ट डिझाईनिंग

- लॅन्डस्केपिंगसाठी अंदाजे खर्चाचे नियोजन

- ऑटोकॅड सॉफ्टवेअर

- पर्यावरणीय आणि कायदेशीर पैलू

- औद्योगिक क्षेत्रातील जैवविविधता व तेथील प्लांटेशनचे नियम

हा अभ्यासक्रम डिझाईन करताना आर्किटेक्चर पदवीधर, स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, लॅन्डस्केप कन्सल्टंट यांना प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी आणि तांत्रिक बाबींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलाही आर्किटेक्चर एखादा बेसिक लॅन्डस्केप सहज डिझाईन करू शकेल आणि एखादा स्थापत्य अभियंता प्लांटेशन करताना सहजता यावी यासाठी उपयोगी बारकावे शिकू शकेल.
- डॉ. मंजूषा मोरे, शैक्षणिक विभाग प्रमुख, ‘एसआयआयएलसी’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com