Onion Rate : आवक वाढल्याने कांदादरात घसरण ; वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात ४० रुपयांनी विक्री

Onion Market : गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या कांद्याच्या भावात आता घसरण झाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाव २० टक्क्यांनी घसरले आहेत.
Onion Rate kolhapur
Onion Rate kolhapuragrowon
Published on
Updated on

Vashi Onion Market : वाशी : गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या कांद्याच्या भावात आता घसरण झाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाव २० टक्क्यांनी घसरले आहेत. वाशीच्या एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक वाढली असून बुधवारी (ता. १८) २३,४८७ गोणी (२५ किलो प्रतिगोणी) आवक झाली.

आवक वाढल्याने भाव घसरले असून सध्या चांगल्या प्रतीचा कांदा ४० ते ५० रुपये किलो भावाने विकला जात आहे. या कांद्याला आठवडाभरापूर्वी ६५ ते ७० रुपये किलो इतका भाव मिळत होता.
बाजारात महाराष्ट्रातील नाशिक, संगमनेर या भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू झाली असून कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधून कांदा बाजारात आल्याने भाव उतरले आहेत.

सध्या मध्यम आकाराचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असून त्याचे भाव सरासरी ३० रुपये प्रतिकिलो इतके आहेत. बाजारात जुना कांदा जवळपास संपत आला असून त्याच्या तुलनेत नवीन मालाला मागणी कमी असल्याने भावही कमी मिळत आहे; मात्र येत्या काळात नवीन कांदा बाजारात उपलब्ध राहील, त्यामुळे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Onion Rate kolhapur
Tomato Market: टोमॅटो घाऊक बाजारात ५० रुपये असताना किरकोळ विक्री १५० रुपयांनी कशी होते?

बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाव आणखी उतरण्याच्या आधी आपला कांदा विकला जावा आणि चांगला भाव मिळावा, या आशेने शेतकरी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

महाराष्ट्रासह परराज्यातील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजरातदेखील कांद्याचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानचा माल आल्यानेही भावात घसरण झाली आहे. येत्या काळात भाव अधिक घसरण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा एपीएमसी बाजाराकडे वळवला आहे.
- मनोहर तोतलानी, कांदा-बटाटा व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com