Onion Rate : कांद्याला मिळतोय चांगला भाव, सणासुदीत शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येणार

Onion Prices : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती.
Onion Rate
Onion Rateagrowon
Published on
Updated on

Onion Rate Maharashtra : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

कांदाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत ३५ ते ६० रुपये किलो असा दर झाला आहे.

कांद्याचा भाव २३ रुपये किलोवरून ३२ रुपये किलोवर गेला आहे. राज्यात झालेला कमी पाऊस आणि कांदा काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादन कमी झाली आहे तर आवक वाढली आहे. तसेच मागच्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढले असताना केंद्राने बफर स्टॉक कांदाही बाहेर काढला होता.

जेथे सरकार घाऊक बाजारात कांदा विकत आहे, तेथे कांद्याचे दर तुलनेने कमी प्रमाणात म्हणजेच ७ ते १० टक्के वाढले आहेत. याबाबत कांदा व्यापारी यांच्या म्हणण्यानुसार, यंदा खरिपातील लाल कांद्याचे पीक एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव वाढ होत आहे.

Onion Rate
Onion Export News : घोटाळेबाजांमुळे कांदा निर्यातीवर टाच येणार?

दरम्यान २०२२-२३ च्या सरकारी अंदाजानुसार, यंदा गहू आणि डाळींच्या उत्पादनातही कपात होणार आहे. गव्हाचे उत्पादन २२ लाख टनांनी घटून ११.०५ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. डाळींचे उत्पादन १५ लाख टनांनी घटून २.६ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. तांदूळ, मोहरी आणि मका यांचे मात्र विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होऊन प्रति क्विंटल कमीतकमी ३ हजार रुपये, जास्तीतजास्त ४ हजार ५५१ रुपये तर सरासरी ४ हजार २०० रुपये इतका भाव मिळाला आहे. सध्या कांद्याची आवक कमी होत असल्यामुळे भाव टिकून आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला कवडीमोल भाव मिळाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना उकिरड्यावर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com